
लोकशासन-प्रतिनिधी : बोरगांव ईश्वरपूर ( ता.वाळवा)
सांगली : (ता.०९) बोरगाव (ता.वाळवा )येथील रसिका मल्लेशी कदम या विवाहित महिलेचा प्रेम संबंधातून खून करून प्रियकरांने कृष्णा नदीत फेकला मृतदेह तीन दिवसांनी मसुचीवाडी येथे सापडला. आरोपी तुकाराम वाटेगांवकर (रा. बोरगांव ) याने या खूनाची कबुली ईश्वरपूर पोलिसांना दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी बचाव पथकांने नदीपात्राकडे धाव घेवुन बोटीच्या सहाय्याने तीन दिवसापासून सुरू केलेल्या शोध मोहिमेला शुक्रवारी यश आले.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून वाळवा तालुक्यांतील एका गावामध्ये आपल्या दोन मुलीसह सदरील महिला वास्तव्यास होती तिचे पती कर्नाटकात मजुरीचे काम करतात तर हि महिला घर काम करून कुटुंबाचा उदारनिर्वाह करत होती. तेथेच आरोपी तुकाराम वाटेगावकरांचे आणि या महिलेची ओळख झाली होती, ओळखीचे नातं अगदी प्रेम संबंधापर्यंत बनलं, ईश्वरपूर येथील महिलेचे तुकाराम वाटेगांवकर यांच्यासोबत प्रेम संबंध होते मात्र ती वारंवार तुकारामकडे पैशाची मागणी वारंवार करत होती. त्यामुळे या दोघांमध्ये नेहमीच सतत वाद निर्माण होत होते. आणि याच वादाला कंटाळल्याने तुकाराम ने तिला पैसे देतो असे सांगून शेतातील शेडमध्ये बोलवले तेथेही दोघांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला. आणि महिलेचा गळा आवळून खून केला अशी कबुली आरोपी प्रियकर तुकाराम वाटेगांवकरांनी पोलिसांसमोर दिली.
यामध्ये आरोपीने तिचा मृतदेह दुचाकीवरून ठेवून ताकारी येथील कृष्णा नदीवरील पुलावरून दुचाकीसह फेकला होता. या शोध मोहिमेदरम्यान प्रथम दुचाकी सापडली मात्र मृतदेह आढळला नव्हता शोध मोहीम तीन दिवस अखंड सुरू होती. अखेर शुक्रवारी सकाळी साडे अकरांच्या सुमारांस रसिकाचा मृतदेह ताकारी पुलापासून साधारण सात किलोमीटर अंतरावर मुसचीवाडी घाटाजवळ मिळून आला. यामध्ये आरोपी प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान घुगे करीत आहेत.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8007108688