सातारा तालुका पोलीस स्टेशनची मोठी कारवाई साडेचार लाख रुपयांचा मुददेमाल केला हस्तगत ! डी बी पथकाची कामगिरी

Spread the love

लोकशासन-प्रतिनिधी: सातारा ग्रामीण

सातारा: (ता.०८) सातारा तालुका पोलीस स्टेशनच कडून मोठी कारवाई करण सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.या बाबतीत सविस्तर वृत्त असे की, सातारा तालुका पोलीस ठाणे येथील पोलीस हवालदार राजु शिखरे यांना गोपनिय माहिती मिळालेल्या माहितीनुसार शेंद्रे गावाच्या हद्दीत काही इसम चार चाकी वाहनामध्ये बेकायदेशीर रित्या विदेशी दारु वाहतुक करत विक्री करता आणणार आहेत.सदरच्या माहिती वरुन पथक तयार करुन सापळा रचण्यात आला होता.

सदर माहितीच्या अनुषंगाने तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा, वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा राजीव नवले यांचे मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी सदर गोपनिय माहिती नुसार डीबी पथकास सदर माहितीची पडताळणी करुन कारवाई करण्यास कळविले होते. त्यानुसार डीबी पथकाने दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी रात्री ११:०० वाजले च्या सुमारास सातारा तालुका पोलीस ठाणेचे शेद्रे गावचे हददीमध्ये पुणे ते कोल्हापुर जाणारे हायवे रोडला मारुती स्विफ्ट कार क्रमांक एमएच ११ एके २०९२ ही थांबवून गाडीतील इसमांकडे चौकशी केली असता गाडीतील इसमांने विचारलेल्या प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तसेच सदर गाडीची तपासणी करण्यात आडकाठी केल्याने गोपनिय माहितीची खात्री झाल्याने सदर गाडीची दोन पंचासमक्ष तपासणी करुन ९६ हजार ८०० रु. किंमतीची विदेशी दारु व अंदाजे ३ लाख ५० हजार रु किंमतीचे चारचाकी वाहन असा एकुण ४ लाख ४६ हजार ८०० रुपये चा मुददेमाल हस्तगत करणेत आला आहे.

सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस हवालदार किरण निकम हे करित आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक साो, सातारा, तुषार दोशी,अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा, वैशाली कडुकर,उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा राजीव नवले, सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद नेवसे सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोहवा मनोज गायकवाड, पोहवा राजु शिखरे, पोहवा पंकज ढाणे, पोकों संदिप पांडव, पोहवा दादा स्वामी, पोहवा प्रदीप मोहिते यांनी केलेली आहे.सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, राजीव नवले, उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8007108688

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button