
प्रतिनिधी : संजय शिंदे (इंदापूर ग्रामीण) लोकशासन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिमंडळाच्या दालनात मुळशी धरणाचे पाणी पूर्वमुखी वळविणेसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी आमदार अॅड. कुल बोलत होते. हे पाणी पिण्यासाठी वळविल्यास पुणे शहराची मोठी गरज भागेल व खडकवासला धरणाच्या कालव्यावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे मुळशीचे पाणी मूळ पूर्वमुखी प्रवाहात वळविण्यासाठी कार्यवाही करणे आवश्यक आहे अशी मागणी आमदार कुल यांनी केली.
जलविद्युत निर्मितीसाठी मुळशी व कोयना प्रकल्पाद्वारे कृष्णा खोऱ्यातील नैसर्गिकरित्या पूर्वमुखी नद्यांचे कृत्रिमपणे पश्चिमेकडील विपुलतेच्या खोऱ्यात वळविलेले पाणी पूर्वेकडे तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत सुर्वे समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीचे प्रमुख सेवानिवृत्त जलसंपदा सचिव अविनाश सुर्वे व त्यांचे सहकारी राजेंद्र पानसे यांनी सादर केलेल्या अहवालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सकारात्मकता दाखविली असून, पाणी वळविणेबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, श्रीम. अश्विनी भिडे, जलसंपदा अपर मुख्य सचिव दीपक कपूर, समितीचे प्रमुख अविनाश सुर्वे, राजेंद्र पानसे, कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.