
वालचंदनगर : विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब-वालचंदनगर ता. इंदापूर महाविद्यालयामध्ये संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अविष्कार स्पर्धा २०२५-२६ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
अविष्कार स्पर्धेचे उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.स्पर्धेला बहिस्थ परीक्षक म्हणून तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती येथील डॉ. विजय मोहिते व विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय बारामतीचे डॉ. अमर भोसले उपस्थित होते.एकूण 33 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. स्पर्धेचे समन्वयक डॉ. विलास बुवा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी शुभेच्छा संदेश देताना वीरसिंह रणसिंग यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २००६ पासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन सुरू केले. स्पर्धेतून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला व सृजनशीलतेला वाव मिळतो, असे मत व्यक्त करून स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे स्वागत केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक काळंगे, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग, समन्वयक डॉ. विलास बुवा, परीक्षक डॉ. विजय मोहिते व डॉ. अमर भोसले तसेच महाविद्यालयातील डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. सुहास भैरट, प्रा. राजेंद्रकुमार डांगे, डॉ. रामचंद्र पाखरे, प्रा. ज्योत्स्ना गायकवाड, प्रा. विनायक शिंदे, डॉ. बबन साळवे तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.