
लोकशासन- प्रतिनिधी:वालचंदनगर
वालचंदनगर : (ता.१६) इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान निमसाखर ता. इंदापूर संस्थेचे सचिव विरसिंह विश्वासराव रणसिंग यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल स्टार एजुकेशन अवार्ड २०२५ पुरस्कार महाविद्यालयातील सर्वोत्तम व्यवस्थापन प्रणाली या कॅटेगरीमध्ये नेस्को गोरेगाव मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते प्राप्त देण्यात आला.सचिव विरसिंह रणसिंग यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचे, योगदानाचे, नेतृत्वाचे,व्यवस्थापन कौशल्याचे व उत्कृष्टतेचा ध्यास या गुणांचा सन्मान असून शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान तसेच सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग व सहकार्य देत असल्यामुळे त्यांना पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स शैक्षणिक संस्था/संघटनांच्या नाविन्यपूर्ण आणि अग्रगण्य उपक्रमांचे कौतुक करतात,जे विद्यार्थ्यांच्या शिक्षण परिणामांवर त्यांचा खोलवर परिणाम अधोरेखित करतात. अध्यपन प्रक्रियेचा पुनर्शोध, पुनर्परिभाषा आणि पुनर्कल्पना करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना जीवनासाठी तयार करणाऱ्या संस्थांना सन्मानित करणे आणि बक्षीस देवुन संस्थाना सन्मानित करण्यात येत असल्याचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी सांगितले.स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स अध्यापन, शिक्षण आणि रोजगारक्षमतेच्या परिणामांमध्ये क्रांती घडवणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर प्रकाश टाकतात. नवोपक्रम घडवून आणणाऱ्या, नवीन संधी मिळवणाऱ्या आणि दर्जेदार शिक्षणाच्या सर्वोच्च मानकांचे पालन करणाऱ्या इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान या ग्रामीण भागातील संस्थेच्या शैक्षणिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेवून सन्मानित केले असल्यामुळे आणखी जोमाने यशस्वीपणे शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल सुरू ठेवणार असल्याचे रणसिंग यांनी सांगितले.
संस्था सचिव विरसिंह विश्वासराव रणसिंग यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल स्टार एजुकेशन अवार्ड २०२५ पुरस्कार महाविद्यालयातील सर्वोत्तम व्यवस्थापन प्रणाली साठी मिळाल्याबद्दल
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम, खजिनदार विरबाला पाटील,विश्वस्त शंकरराव रणसिंग,विश्वस्त कुलदीप हेगडे,विश्वस्त राही रणसिंग,विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक काळंगे,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग, उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे,माध्यमिक विद्यालय तावशीचे मुख्याध्यापक महादेव बागल,माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद भोंग ,महाविद्यालयीन प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.