शेळगाव मधील संत मुक्ताबाई मंदिराला ”ब” वर्ग दर्जा देणार : मंत्री जयकुमार गोरे

Spread the love

लोकशासनकिरण माने, प्रतिनिधी
शेळगाव : (०५)संपूर्ण महाराष्ट्रभर धाकटे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील संत मुक्ताबाई मंदिराला येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये ‘ब ‘वर्ग दर्जा देणार असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
बुधवार (दिनांक ४) रोजी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी निमगाव केतकी शेळगाव गटातील उमेदवार दिपाली राऊत,पंचायत समितीचे उमेदवार शुभम शिंगाडे आणि गोरख आदलिंग यांच्या प्रचारासाठी जयकुमार गोरे हे निमगाव केतकी या ठिकाणी आले असता शेळगाव पंचायत समितीचे उमेदवार शुभम शिंगाडे यांनी मंदिराच्या ‘ब’ वर्गासाठी मंत्री गोरे यांना निवेदन दिले.

त्यावेळी त्यांनी पुढे बोलताना सांगितले की,संत मुक्ताबाई मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा देऊन मंदिरासाठी पाच कोटी रुपये निधीदेखील देणार असल्याचे सांगितले असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर संबंधित विभागाला द्यावा असे देखील गोरे यांनी सांगितले.
यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर,जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने,बाबासाहेब चवरे,माऊली चवरे इंदापूर तालुका उपाध्यक्ष सत्यजित रणवरे,मोहन दुधाळ,तानाजी थोरात,लक्ष्मण पवार,ॲड.अशोक शिंगाडे,भगवान जाधव,सचिन चवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button