उद्धट बस स्थानकाची दुरवस्था; शाळकरी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे राहण्याची वेळ

Spread the love

लोकशासन– नाजिया सय्यद, पत्रकार
उद्धट:(१२) बारामती – नरसिंगपुर (BKBN) मार्गावरील उद्धट(ता.इंदापुर) बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे. बस स्थानकाजवळ फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले असून, परिसरात झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने बस स्थानक पूर्णपणे झाकले गेले आहे. परिणामी, प्रवाशांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, वाढलेल्या झाडाझुडपांमुळे बस स्थानक दूरवरून दिसत नाही. काही वेळा बस ही थांबत नाही त्यामुळे बस थांबवताना अडचणी निर्माण होत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर उभे राहण्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
संबंधित विभागाने तात्काळ झाडे-झुडपे हटवून बस स्थानकाची स्वच्छता व दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांकडून जोर धरत आहे. प्रशासनाने दुर्लक्ष न करता त्वरीत उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button