
लोकशासन-प्रतिनिधी: शंकर जोग , पुणे
भगवान महावीर जयंतीच्या दिवशी कत्तलखाने बंद करा अशी मागणी अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.भगवान महावीर यांची जयंती गुरुवारी १० एप्रिल रोजी असुन त्या दिवशी पुणे शहर आणि जिल्ह्यातील कत्तलखाने व मांस मच्छी विक्री दुकाने बंद ठेवण्यात यावीत अशी मागणी अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी, जैन संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी, विनोद सोलंकी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश जैन प्रकोष्ठ, मयूर सरनोत पुणे शहर अध्यक्ष, अभिजीत शहा पुणे शहर उपाध्यक्ष, राजेश साळेचा, सुखदेव चरण, अरविंद जैन आदि यावेळी उपस्थित होते.