
लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर ग्रामीण
वालचंदनगर : इंदापूर, दौंड व बारामती तालुक्यातील अनेक कारखाने , कंपन्यांकडून प्रदूषित पाणी परीसरातील नदी,ओढे व नाल्यात सोडले जात असून यामुळे जलचर प्राण्यांना धोका निर्माण होत असुन जनावरांच्या व मानवी आरोग्याच्या दृष्टिने हानीकारक ठरत असल्याने प्रदूषणाला आळा बसावा असे निवेदन पर्यावरण व प्रदूषण रक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश कणसे यांच्याकडून उप प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ बारामती येथे देण्यात आले.
इंदापूर,बारामती व दौंड तालुक्यात अनेक साखर कारखाने तसेच केमिकल कंपन्या असून या कंपनीतून येणारे केमिकल युक्त पाणी परीसरातच सोडले जात असल्याने परीसरातील विहीरी व कुपनलिका मध्ये हे पाणी उतरत असल्याने पाणी दुषीत होत असून यावर लवकरात लवकर उपाय योजना न केल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचे कणसे यांनी सांगीतले.यावेळी नितीन करगळ,अजित कणसे,प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
भारतीय स्वतंत्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
