निमसाखर-पळसमंडळ बंधाऱ्याचा भराव गेला वाहुन ! वाहतुकीस अडथळा

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर ग्रामीण

इंदापूर : निमसाखर (ता. इंदापूर) येथील निमसाखर-पळसमंडळ बंधाऱ्याचा भराव वाहुन गेल्याने या बंधाऱ्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.सोलापूर जिल्ह्यातील पळसमंडळ तर पुणे जिल्ह्यातील निमसाखर ला जोडणारा निमसाखर पळसमंडळ बंधारा सोलापूर जिल्ह्यातील पळसमंडळ, चव्हाणवाडी,फोंडशिरस, माळशिरस, सदाशिवनगर तर पुणे जिल्ह्यातील निमसाखर,वालचंदनगर, कळंब, बारामती कडे जाण्यासाठी परीसरातील विद्यार्थी, शेतकरी, नागरिक, व्यवसायीक व नोकरदार यांच्यासाठी जवळचा व महत्त्वाचा आहे.त्यामुळे या बंधाऱ्याचा भराव वाहुन गेल्याने धोकादायक पध्दतीने विद्यार्थ्यी ,शेतकऱ्यांना ये-जा करावी लागत आहे.

इंदापूर तालुक्यातील निमसाखर, कळंब, वालचंदनगर या ठिकाणी मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत. या परिसरात पळसमंडळ भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. मात्र या बंधाऱ्या वरील भरावच वाहुन गेल्याने विद्यार्थ्यांनसाठी येथुन प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे.

वास्तविक पाहता दर वर्षी पावसाळ्यात नदीच्या पुराच्या पाण्याने हा भराव वाहून जातो. दर वर्षी भराव भरण्यासाठी व बंधारा दुरूस्तीसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा खर्च केला जातो.मात्र दर वर्षी हा भराव वाहून जात असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात जातो.गेली अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांकडून या बंधाऱ्याची कायमस्वरूपी दुरूस्ती करण्याची मागणी करण्यात येते मात्र प्रशासनाचा गलथान कारभार व राजकीय अनास्थेमुळे हा प्रश्न अद्याप पर्यंत सुटला नाही.मागील काळात भराव वाहून गेल्यानंतर मोठे आंदोलन झाले होते.आंदोलनाच्या दुसर्‍याच दिवशी आमदार दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी भेट देऊन मोठा गाजावाजा करत कामाचे भुमिपूजन केले.मात्र दोन वर्षे उलटून देखील परिस्थिती जैसे थे च असल्याने नागरिकां कडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button