इंदापूर तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा झंझावाती गटनिहाय दौरा : ८ जिल्हा परिषद गटांत बैठका

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर ग्रामीण

इंदापूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने इंदापूर तालुक्यात रविवार, दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषद गटनिहाय झंझावाती दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता वालचंदनगर येथून या दौऱ्याला सुरुवात होणार असून सायंकाळी ७.३० वाजता लाखेवाडी येथे दौऱ्याची सांगता होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत व विभागीय समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हाप्रमुख संजय काळे यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनाखाली हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.या दौऱ्यात वालचंदनगर-बोरी, सणसर-लासुर्णे, भिगवण-शेटफळ गढे, पळसदेव-बिजवडी, निमगाव-शेळगाव, इंदापूर शहर, वडापुरी-माळवाडी, बावडा-लुमेवाडी आणि काटी-लाखेवाडी या नऊ जिल्हा परिषद गटांमध्ये पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठका घेण्यात येणार आहेत.

या बैठकींमध्ये पक्ष संघटन मजबूत करणे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक आढावा घेणे, बूथनिहाय तयारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवणे तसेच स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे.”इंदापूर तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने हा गटनिहाय दौरा आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटातील शिवसैनिक, पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून स्थानिक पातळीवरील प्रश्न आणि संघटनात्मक बाबी समजून घेतल्या जाणार आहेत.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इंदापूर तालुक्यात शिवसैनिक मोठ्या ताकदीने काम करत आहेत. आगामी काळात प्रत्येक गाव, वाडी-वस्ती आणि बूथपर्यंत पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. या दौऱ्याला पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्ष संघटनेला बळ द्यावे”

सुदर्शन रणवरे,शिवसेना तालुका संघटक

इंदापूर,दौऱ्याचे वेळापत्रकसकाळी १०.०० ते १०.४५ — वालचंदनगर-बोरी जिल्हा परिषद गट, वालचंदनगर सकाळी ११.०० ते दुपारी १२.१५ — सणसर-लासुर्णे जिल्हा परिषद गट, सणसर दुपारी १२.३० ते १.१५ — भिगवण-शेटफळ गढे जिल्हा परिषद गट, भिगवण दुपारी २.०० ते २.४५ — पळसदेव-बिजवडी जिल्हा परिषद गट, भादलवाडी दुपारी ३.०० ते ३.५० — निमगाव-शेळगाव जिल्हा परिषद गट, निमगाव केतकीदुपारी ४.०५ ते ४.४५ — इंदापूर शहर सायंकाळी ५.०० ते ५.४० — वडापुरी-माळवाडी जिल्हा परिषद गट, इंदापूर/वडापुरी सायंकाळी ६.०० ते ६.४५ — बावडा-लुमेवाडी जिल्हा परिषद गट, सुरवड सायंकाळी ७.०० ते ७.३० — काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद गट, लाखेवाडी या दौऱ्यास सर्व पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.आपले सहकारी,सुदर्शन रणवरे शिवसेना तालुका संघटक, इंदापूर दिपक खरात शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख, इंदापूर राणुताई इंगवले महिला आघाडी तालुका संघटिका ॲड. राहुल बंडगर युवासेना जिल्हा समन्वयक कुलदीप निंबाळकर युवासेना उपजिल्हा युवाधिकारी सचिन इंगळे युवासेना तालुका युवाधिकारी अविनाश खंडाळे युवासेना शहर युवाधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button