
लोकशासन- प्रतिनिधी : सत्यजीत रणवरे
निमसाखर , ता.इंदापुर येथे “संन्त निरंकारी सतसंग” गुरुवार दिनांक १७ एप्रिल रोजी बाजार तळ येथे आयोजित करण्यात आला आहे.माणसातील माणूस शोधण्याची शिकवण देणाऱ्या माणसाच्या शरीरातील ईश्वरी अंश आणि मानवतेची पूजा याचा प्रसार आणि प्रचार संन्त निरंकारी सतसंग कडून करण्यात येतो.मानवता आणि ईश्वरी शक्तीची जाणीव या सोबतच निरंकारी मिशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्ये, स्वच्छता अभियान, आरोग्य सेवा, शिक्षण यासारखे कार्यक्रम राबविले जातात.
संन्त निरंकारी मिशनच्या विविध मंडळे कार्यरत असुन या माध्यमातून सामाजिक शांतता,सलोखा तसेच युवकांना निरंकारी तत्त्वज्ञानाशी जोडण्यासाठी संन्त निरंकारी युथ फोरम काम करीत आहे.तरुणांना व्यसनाधीनते पासून परावृत्त करुन अध्यात्माच्या दिशेला प्रेरीत करण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न केले जातात.