निमसाखर मध्ये प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थांची आरती !

Spread the love

निमसाखर : इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे स्वामी समर्थ महाराजांची आरती प्रत्येक गुरुवारी केली जात असून निमसाखर व परीसरातील शेकडो स्वामी भक्त स्वामी समर्थांच्या आशिर्वादासाठी या आरतीला‌ उपस्थित राहतात.


निमसाखर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे प्रत्येक गुरुवारी सायंकाळी ०७:०० वाजता स्वामी समर्थ महाराजांची आरती गेली अनेक महिन्यांपासून करण्यात येत असून गुरुवारी स्वामींच्या आरतीसाठी व आशीर्वादासाठी पंचक्रोशीतील अनेक अबालवृद्ध भावीक भक्त येत असतात.त्यामुळे गुरुवारी हा परीसर स्वामी समर्थांच्या नावाने दुमदुमून जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button