
लोकशासन- प्रतिनिधी:शिवाजी पवार,इंदापूर
नगरपरिषदे कडून जाणून-बजून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर, राजे उमाजी नाईक नगर, बजरंग नगर व लोकमान्य नगर या परिसरातील बहुतांश मागासवर्गीय लोकांना पिण्याच्या पाण्याचे नियमित पाणीपुरवठा केला जात नसल्याचा आरोप माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी केला आहे.
सोनवणे यांनी या बाबतचे इंदापूर नगरपालिकेचे मुख्यअधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेले असता निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्यअधिकारी उपस्थितीत नसल्यामुळे एक खिडकी येथे निवेदन देऊन अधिकाऱ्यांना निवेदन समाज माध्यमाद्वारे दिले आहे.
याआधीही त्यांनी नगरपालिकेकडे लेखी तक्रार देऊन देखील नगरपालिकेकडून दिवसातील ४८ तासांपैकी फक्त ४ तासच पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा नियमित व पूर्ण दाबाने होत. नसल्याने नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याअभावी आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. सन २०२१ मध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी शासनाकडून खर्च करून इंदापूर शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी भीमा नदीवरून पाईपलाईन करण्यात आलेली असताना देखील इंदापूर नगरपालिकेकडून आज पर्यंत नियमित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आलेला नाही. पिण्याचे पाणी हे दोन दिवसातून एकदा आणि ते फक्त २ तास पुरवठा केला जात आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर, राजे उमाजी नाईक नगर, बजरंग नगर व लोकमान्य नगर या परिसरातील बहुतांशी नागरिक हे काबाडकष्ट व रोजंदारीचे काम करणारे असून त्या ठिकाणी नियमित व अवेळी पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या गैरहजरीत पाण्याची साठवण करता येत नाही. परिणामी त्यांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
अशा प्रकारच्या अनेक तोंडी आणि लेखी तक्रारी नगरपालिके कडे देऊन देखील नगरपालिका याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नसल्यामुळे लवकरच इंदापूर नगरपालिकेच्या समोर थाळी नाद व हंडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे व व तेथील स्थानिक नागरिकांनी दिला आहे.