
लोकशासन– प्रतिनिधी : शिवाजी पवार,इंदापुर
अहेमदरजा (तशुभाई) सय्यद यांच्या संकल्पनेतून इंदापूर शहरातील ऐतिहासिक जामा मस्जिद मध्ये मस्जिदचे ट्रस्टी अहमदभाई सय्यद, इकबालभाई सय्यद, रफीउद्दिनभाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारत देशाच्या नागरिकावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा इंदापूर शहरातील ऐतिहासिक जामा मस्जिद मध्ये जाहीर निषेध करण्यात आला.
तत्पूर्वी शुक्रवारी पवित्र असणाऱ्या नमाज पटनाच्या अगोदर पूर्ण अर्धा तासाचे बयान (प्रवचन) मौलानांनी देशभक्तीवर वर केले यात त्यांनी प्रामुख्याने आपल्या इस्लाम धर्मामध्ये देश भक्तीला किती महत्त्व दिलेले आहे हे सर्व बांधवांना समजून सांगितले आपला इस्लाम धर्म सांगतो की देश प्रथम आपण देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या संरक्षणासाठी, देशाची मान उंचावण्यासाठी आणि सर्व जगात देशाला महासत्ता करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले पाहिजे हेच आपला इस्लाम शिकवतो आणि त्यावर आचरण करणे हेच आपले कर्तव्य आहे त्यानंतर सिराजुद्दीन भाई सय्यद या ज्येष्ठ आजोबांनी या भ्याड हल्ल्याचे तीव्र शब्दात निषेध नोंदवून मार्गदर्शन केले.
तसेच अहेमदरजा (तशुभाई) सय्यद यांनी सांगितले की स्वातंत्र्योत्तर काळापासून मुस्लिम समाज हा देशभक्त आहे आणि देशभक्ती पासून कधीच मागे हटला नाही त्याची अनेक उदाहरणे आहेत आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी चाललेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मुस्लिम स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांनी आपल्या जीवाचे बलिदान केले भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद यांनी काम पाहिले त्यानंतर डॉ. झाकीर हुसेन हे भारताचे राष्ट्रपती झाले तसेच डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम साहेब यांनी मिसाईल मॅन म्हणून जगभरात ख्याती मिळवली आणि आणि त्यांना सुद्धा भारताचे राष्ट्रपती म्हणून काम करण्याची सबंध देशवासीयांनी संधी दिली अशी किती तरी उदाहरणे आहेत.
सध्य परिस्थितीत पाकिस्तानच्या विरोधात भारताने सिंदूर ऑपरेशन केले त्याचे नेतृत्वही कर्नल सोफिया कुरेशी या मुस्लिम महिलेने केले हे मुस्लिम समाजासाठी आणि संबंध देशासाठी अभिमानास्पद बाब आहे आणि इथून पुढे सुद्धा आपण सर्वजण मिळून देशासाठी असे तत्पर राहू आणि देशहितासाठी बलिदान देण्याचे वेळ आली तर सर्वप्रथम मुस्लिम युवक पुढे राहतील असे त्यांनी सांगितले यावेळी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम युवक तथा मुस्लिम समाजातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.