
प्रतिनिधी : लोकशासन
भाजप च्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी काल दिनांक २० मार्च ला विधान परिषदेत ठाकरेच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्या वरती शिरसंधान डागले होते.यापुर्वी अनिल परब यांनी चित्रा वाघ यांच्यावर यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना चित्रा वाघ या संतापलेल्या दिसून आल्या.
विधानपरीषदेत बोलताना चित्रा वाघ यांनी अनिल परब यांना उद्देशून बर झाल आलात सभागृहात म्हणत पुढे बोलताना तुमच्या सारखे छप्पन पायाला बांधून फिरते असे वक्तव्य केले होते.तर संजय राठोड प्रकरणी उध्दव ठाकरे यांनीच राठोड यांना क्लीन चिट दिली असल्याचे सांगितले.
चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी वाघ यांच्या आरोपांचा समाचार घेतला.या वेळी सुषमा अंधारे यांनी ज्यांना सभागृहामध्ये आम्ही सदस्यत्व दिले त्या जिकडे खवा तिकडे थवा असे म्हणत उडुन भुर झाल्या आहेत असे सांगितले.तर उध्दव ठाकरेंनी दिलेली क्लिनचीट चुकीची असेल तर फडणवीसांनी ती केस पुन्हा खुली करावी असे आवाहन केले. असुन महंमद अहमद नामक चाचा व चित्रा वाघ यांनीच पिडीत महिलेला ढाबुन ठेवून पिडीतेला विशिष्ट जबाब देण्यास वाघ यांनी भाग पाडल्याचे पिडीत महिलेने स्पष्ट केले असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.
…तर परब साहेबांनी थोडी फार का होईना आकडेवारी बाहेर काढली !
चित्रा वाघ यांनी केलेल्या “तुमच्या सारखे छप्पन पायाला बांधून फिरते” असे वक्तव्य केले होते.या अनुषंगाने अंधारे यांनी सांगितलेला आकडा थोडा कमी आहे.लोक हा आकडेवारी जास्त देतात असे उपहासात्मक वक्तव्य केले.