पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी पदभार स्वीकारताच इंदापूर पोलीस स्टेशनला भेट ! सुरक्षेच्या बाबतीत पत्रकारा बरोबर विविध विषयांवर केली चर्चा

Spread the love

लोकशासन – प्रतिनिधी:शिवाजी पवार,इंदापूर

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच संदीप सिंह गिल यांनी इंदापूर येथील पोलीस स्टेशनला भेट दिली आणि प्रसारमाध्यमाच्या पत्रकारांशी विविध विषयावर सखोल चर्चा केली. यावेळी अनेक प्रसार माध्यमाचे पत्रकार उपस्थित होते.

तसेच इंदापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते. इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा सत्कार केला. त्यांच्यासोबत अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार ,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

इंदापूर पोलीस स्टेशन यांना भेट दिल्यानंतर तिथून ते इंदापूर तालुक्यातील निरा नरसिंहपूर येथील पोलीस स्टेशनची पाहणी करून बारामतीकडे रवाना झाले. बारामती येथील पोलीस स्टेशन पोलीस अधीक्षक कार्यालय सर्व गोष्टीची पाहणी केली.

तत्पूर्वी त्यांनी वार्ताहरांशी आणि प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, इंदापूर तालुक्यात मी पहिल्यांदाच पदभार स्वीकारल्यानंतर आलो आहे‌‌. जनतेने थेट माझ्याशी संवाद साधावा जर कुठल्याही पोलीस स्टेशनचा अधिकारी तुम्हाला प्रतिसाद देत नसेल, तुमचं म्हणणं ऐकून घेत नसेल तर तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधा.

कायदा हातात घेण्याचा कोणीही प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नाही. कोयता गॅंग असो, की गोळीबार प्रकरण असो त्याचा सखोल तपास केला जाईल आणि कडक कारवाई केली जाईल असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button