
निरवांगी (ता.इंदापुर) येथील कोरडा पडलेला बंधारा
इंदापुर : लोकशासन
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जलवाहिनी असलेल्या निरा नदीच्या पाणी पातळी मध्ये कमालीची घट होत असून दिवसेंदिवस उन्हाच्या वाढत्या तीव्रते सोबत नदी पात्रातील पाण्याची पातळी घटत चालली आहे.
सध्या निमसाखर च्या पश्चिम भागात नदी पात्रात पाणी साठा दिसून येत असला तर निमसाखर पासून पुढे निरवांगी बाजूला नदी पात्र कोरडे पडले आहे.त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची अवस्था बिकट असल्याने साधारण १५ जुन पर्यंत पाण्याच्या बाबतीत दाहकता निर्माण होणार असल्याची चिंता शेतकरी वर्गा मधुन व्यक्त केली जात आहे.निरा नदी वरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांची दरपे टाकुन पाणी गळती थांबवण्यात आली असल्याने फेब्रुवारी महिन्याचा शेवट ते मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्या पर्यंतच हे पाणी टिकु शकते.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात ऊस पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असुन ऊसा सोबतच डाळिंब,केळी,पेरु, द्राक्ष या सारख्या फळबागांचे क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात आहे तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी मका,कडवळ लावले जात असून या पिकांचे भवितव्य बहुतांश प्रमाणात निरा नदी च्या पाण्या वरतीच अवलंबून आहे.
निरा नदी पात्रात सध्या पाणी पातळी कमी होत असून वाढत्या उन्हामुळे हे पाणी पंधरा ते वीस दिवसांन पैक्षा जास्त दिवस पुरेल असे वाटत नाही.आता आमच्या कडे ऊस पिक असुन नदी पात्रातील पाणी संपल्यानंतर पावसाळ्या पर्यंत पिकासाठी व जनावरांच्या पिण्यासाठी च्या पाण्याची समस्या भेडसावणार आहे. सध्या निरा नदी मध्ये निमसाखर पासून खाली निरवांगी ,खोरोची भागात पाणी राहिले नसून सध्याच पिकासाठी पाण्याची चणचण भासत आहे त्यामुळे पावसाळ्या पर्यंत या भागातील पिकांच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बननार आहे असे दिसत आहे.