
प्रतिनिधी : संजय शिंदे (इंदापूर ग्रामीण) लोकशासन
शासन नियमाप्रमाणे भिगवण ग्रामपंचायत उत्पन्नाच्या ५% निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याची तरतुद असते. त्या अनुशंगाने ग्रामपंचायत भिगवण यांचेकडुन भिगवण गावामधील ७६ दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी र.रू.२००० /- एवढ्या रकमेचा धनादेश आज ग्रामपंचायत भिगवण कार्यालयामध्ये देण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच गुराप्पा पवार, उपसरपंच सत्यवान भोसले, ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय परदेशी, पराग जाधव, संजय देहाडे, तानाजी वायसे, कपिल भाकरे, तुकाराम काळे, दत्तात्रय धवडे, अशोक काटे, रमेश धवडे, जावेद शेख व दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते धनादेशाचे वाटप झाल्याने दिव्यांग लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

तसेच गावामध्ये आणखी कोणी लाभार्थी राहीलेले असल्यास ३० मार्च अगोदर आपले कागदपत्र ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावेत म्हणजे संबंधीत लाभार्थ्यास लाभ देता येईल असे आवाहन सरपंच गुराप्पा पवार यांनी केले.