श्री संत गुलाब बाबा पालखी प्रस्थानने रेडा नगरीला पंढरपुराचे स्वरूप

Spread the love

लोकशासन – प्रतिनिधी इंदापूर ग्रामीण

योगीराज श्री संतराज पालखी सोहळ्याच्या आगमनाने व श्री संत गुलाब बाबा पालखी प्रस्थानने रेडा नगरीला पंढरपुराचे स्वरूप आले तर संत गुलाबबाबा आणि योगीराज संतराज पालखी सोहळा दोन संतांच्या भेटीने हजारो वारकऱ्यांनी ह्याची देही ह्याची डोळा अनुभवला.

इंदापूर तालुक्यातील रेडा या गावातून श्री संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे प्रस्थान ठीक चार वाजून बत्तीस मिनिटांनी (दि.३०) जून रोजी झाले. रेडा पंचक्रोशीतील आणि महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध राज्यातून श्री संत गुलाब बाबा भक्तांचे पालखी प्रस्थान साठी आगमन झाले होते.त्याच बरोबर गेले ५८ वर्ष योगीराज संतराज पालखी सोहळा रेडा गावी मुक्कामी येत असतो.

एका पालखी सोहळ्याचे प्रस्थान आणि दुसऱ्या पालखी सोहळ्याचा आगमन यामुळे रेडा गावाला पंढरपूरचे स्वरूप आले होते. दोन संतांच्या भेटीचा अनुभव हाजारो वारकऱ्यांनी ह्याची देही ह्याची डोळा घेतल्याचा चेहऱ्यावर प्रत्येकाच्या भाव दिसत होता.

श्री संत गुलाबबाबा मंदिरातून श्री संत गुलाब बाबा पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले आणि योगीराज संतराज महाराज पालखी सोहळा रेडा गावी आगमन होताच रेडा ग्रामस्थांच्या वतीने तोफांची सलामी देऊन स्वागत करण्यात आले. रेडा गावाच्या वतीने योगीराज संतराज पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत करण्यात आले आणि श्री संत गुलाब बाबा पालखी सोहळा जंगी प्रस्थान करण्यात आले. दोन्ही पालखी सोहळ्याच्या भेटीचा क्षण हजारो वारकऱ्यांनी आपल्या डोळ्यांमध्ये साठवला. जिकडे बघावे तिकडे भगवी पताका ,मुखी हरी नाम जयघोष.. विठ्ठल विठ्ठल बोले मुखी आणि वारकरी पायी चाले असे आनंदाचे वातावरण जिकडे तिकडे पाहायला मिळत होते.

श्री संत गुलाब बाबा पालखी प्रस्थान प्रसंगी श्री संत गुलाब बाबा पालखी सोहळ्याचे प्रमुख अॕड.तानाजीराव बाबुराव देवकर, सचिव तुकाराम जगदाळे व विश्वस्त मंडळींनी आलेल्या सर्व मान्यवरांचे फेटे बांधून श्रीफळ देऊन स्वागत केले. संत गुलाब बाबा मंदिरात श्रीची आरती झाली ,अश्वाचे पूजन झाले आणि पालखी प्रस्थान मोठ्या उत्साह मध्ये संपन्न झाले.तसेच योगीराज संतराज पालखी सोहळ्याचे आगमन गावाच्या वेशीवर झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने पालखी खांद्यावर घेण्यात आली. तोपाची सलामी देत पालखीला वाजत गाजत गावामध्ये आणण्यात आली.

यावेळी कै. शहाजीराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या लेझीम व हलगीच्या नादात पालखी सोहळ्याचे स्वागत केले. पालखीच्या समोर अनेक लेझीम प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. पालखी सोहळा मारुती मंदिरासमोर आल्यानंतर पालखी ग्रामस्थ वतीने नाचवण्यात आली. त्यानंतर योगीराज संतराज पालखी सोहळा आणि श्री संत गुलाब बाबा पालखी सोहळा मारुती मंदिरात विसावल्यानंतर आरती करण्यात आली.

योगीराज संतराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष ह‌.भ.प.नामदेव साठे महाराज,विश्वस्त, विनकरी, झेंडेकरी, चोपदार यांचा फेटा बांधून स्वागत करण्यात आले . यवतमाळ, नंदुरबार संभाजीनगर, पुणे, मुंबई, बुलढाणा ,अमरावती, काटेल टाकरखेड (मोरे ), महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातून आलेल्या भक्ताचे जंगी स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी ह.भ.प.उंबराव देवकर महाराज ,तानाजी वसुदेव देवकर, अॅड.नागेश गुळवे, जालिंदर देवकर,रेडा गावचे निरा भीमा कारखान्याचे संचालक राजेंद्र देवकर, माजी सरपंच सुनीता देवकर ,नानासाहेब देवकर, ग्रामपंचायत सदस्य धनंजय गायकवाड, तुकाराम सोनटक्के, उपसरपंच सचिन हरिदास देवकर, काशिनाथ देवकर,किसन देवकर, शेखर देवकर,पोपट सर्जेराव देवकर,पुप्प गोळे, रणजीत गोळे,धिरज देवकर,सतिश विलास देवकर, संकेत अवचर,उमेश पाटील, दत्तात्रय सोनटक्के,माऊली मगर,नाना मगर,संजय माने,सचिन देवकर, देविदास शिंदे, चंद्रकांत शिंदे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विकास विलास देवकर, रामचंद्र देवकर, देविदास पडळकर, सुनील मोहिते, विजय भोसले, विक्रांत गुळवे,रेडा गावच्या पोलीस पाटील ज्योती भोसले , पत्रकार संतोष भोसले,ग्रामसेवक, तलाठी , ग्रामपंचायत कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

दिनांक १ जून २०२५ रोजी हा श्री संत गुलाब बाबांचा जन्मदिवस असून सकाळी सात वाजता.योगीराज संतराज पालखी सोहळ्याचे रिंगण होणार असून रिंगण झाल्यानंतर पंढरपूरकडे योगीराज संतराज पालखी सोहळा मार्गस्थ होईल आणि त्याच्या पाठोपाठच श्री संत गुलाब बाबा पालखी सोहळा हे पंढरपूरकडे मार्गदर्शन होईल अशी माहिती संतराज पालखी सोहळ्याची अध्यक्ष नामदेव साठे महाराज व श्री संत गुलाब बाबा पालखी सोहळ्याचे अध्यक्ष अॕड.तानाजीराव बाबुराव देवकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button