
लोकशासन – प्रतिनिधी:इंदापूर शहर
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी इंदापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आज शासकीय विश्रामगृह इंदापूर या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय काळे , तालुकाप्रमुख नितीन शिंदे, शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी, तालुका समन्वयक अरुण पवार, तालुका संघटक सुदर्शन रणवरे यांच्यासह उपतालुकाप्रमुख आप्पासाहेब डोंगरे, उपतालुकाप्रमुख संदीप चौधरी, उपतालुकाप्रमुख सोमनाथ शेंडे, युवासेना तालुकाप्रमुख सचिन इंगळे, युवासेना शहरप्रमुख अविनाश खंडाळे, शिवसेना उपशहरप्रमुख संतोष क्षीरसागर, उपशहरप्रमुख बंडु शेवाळे, उपशहरप्रमुख दादा देवकर, विभागप्रमुख रणजित बारवकर, विभागप्रमुख अभिजित पाटील, विभागप्रमुख महादेव चोपडे, उपविभागप्रमुख विजय तरंगे, सुदर्शन माने, ब्रम्हदेव थोरात आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिवसेना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुर्ण ताकदीने लढणार असून त्या अनुषंगाने तयारीचा पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. शिवसेना लवकरच प्रत्येक नव्याने झालेल्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात बैठका घेणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकाभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. लोकांच्या प्रश्नावर कायमच आक्रमक भूमिका घेणारी शिवसेना पुन्हा तीच आक्रमकता घेऊन मैदानात उतरणार आहे.
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या सूचनेनुसार आगामी निवडणुकी संदर्भात पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन चर्चा केली आहे. बैठकीत झालेल्या चर्चेचा अहवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठण्यात येणार आहे असे शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी सांगितले.