
लोकशासन-गणेश गुप्ते,उपसंपादक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सव समितीच्या वतीने अहिल्यादेवी यांच्या बद्दल अनुचित उद्गार काढणाऱ्या सुनील उभे यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची इंदापूर तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी महामातांबद्दल अपशब्द उद्गार काढणाऱ्या प्रवृत्तीचा विजयाताई कोकाटे यांच्याकडून जाहीर निषेध.
इंदापूर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल अनुद्गार काढल्याबद्दल इंदापूर शहरातील नागरिक आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी अहिल्यादेवी होळकर शताब्दी महोत्सव कमिटीच्या वतीने वतीने जाहीर निषेध करून इंदापूरचे तहसीलदार साहेब जीवन बनसोडे व इंदापूर पोलीस स्टेशनचे पीआय यांना निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना महोत्सव समितीच्या विजयाताई कोकाटे म्हणाल्या की अलीकडच्या काळामध्ये आमच्या आदर्श राजमाता बद्दल अश्लील व चुकीचे बोलण्याची संख्या समाजामध्ये वाढू लागलेली आहे ही गुन्हेगारी प्रवृत्ती गाढून टाकली पाहिजे पुणे येथील सुनील उभे या बुद्धि भ्रष्ट झालेल्या तरुणांनी अहिल्यादेवी यांच्या बद्दल फेसबुक वरती अश्लील कमेंट केली आहे.
ही प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे राजमाता अहिल्यादेवी होळकर या आमच्या आदर्श आहेत त्यांचे कार्य संपूर्ण भारत देशाला माहिती आहे त्यांनी वृक्षारोपण भारतातील जेवढेधार्मिक स्थळे आहेत त्या धार्मिक स्थळे मठ व प्रवाशांसाठी निवारा तळी विहिरी बांधल्या आहेत ही कामे इतकी दर्जेदार आहेत की आजही ती कामे जशीच्या तशी आहेत अशा अनेक प्रकारची महान कार्य करणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या बद्दल अनुद्गार काढणे म्हणजे म्हणजे जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढनिर्माण करण्याचा प्रयत्न आहे राजमाते बद्दल बोलणे म्हणजे सूर्यावर झोपण्यासारखे आहे.
या प्रवृत्तीचा मी तीव्र शब्दात निषेध करते हे निवेदन देता वेळी पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे राष्ट्रसेवा दल प्रशासक मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा कृष्णा ताटे इंदापूर तालुका शिवसेनाप्रमुख नितीन शिंदे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अल्पसंख्यांक अध्यक्ष गफूर भाई सय्यद इंदापूर शहर शिवसेनाप्रमुख महादेव सोमवंशी माऊली नाचन इंदापूर अर्बन बँकेचे संचालक अविनाश कोथमीरे अमोल मिसाळ संजय शिंदे सरडेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच आप्पासाहेब माने पोपठ नाना पवार हमीदभाई अत्तार विकास खिल्लारे लक्ष्मणराव तरंगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यानंतर झालेल्या निषेध सभेमध्ये अनेक व त्यांची भाषणे झाली सर्वांनी एक मुखाने उभे यांच्या वरती तातडीने कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली व उभे यांचा जाहीर निषेध केला.