
लोकशासन- उपसंपादक:गणेश गुप्ते
भवानीनगर: दि. (२६) इंदापूर तालुक्यातील सणसर ग्रामपंचायत हद्दीतील गावठाणातील ड्रेनेजच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी डॉ.बाळासाहेब खरे, विशाल रायते, मिलिंद गाडे, राजेंद्र रायते, योगेश गोरे, सुखदेव पवार, रमेश कांबळे, गणेश कांबळे, विशाल काळे, दशरथ भालेकर, बलभीम भालेकर, अशोक काळे, आदींनी सणसर ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन देऊन केली आहे.
सणसर गावठाण (एस.टी. स्टॅन्ड नजीकचा परिसर) सध्या श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरू असून महामार्गामुळे गावठाण सणसर मधील नागरिकांचे घरातील सांडपाण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने या अगोदर ड्रेनेजची व्यवस्था केलेली होती.
परंतु पालखी महामार्गामुळे रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे ड्रेनेज अस्तव्यस्त झालेले आहे सणसर गावामध्ये पावसाळ्यामध्ये यापूर्वी दोनदा मोठा महापूर येऊन ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी घुसले होते.
सुदैवाने महापुराच्या दोन्ही घटना दिवसा झाल्यामुळे जीवित हानी झाली नाही.
सध्या पालखी महामार्गाचे रस्त्याचे काम सुरू आहे अशाच जर मोठा पाऊस झाला तर पावसाचे पाणी व इरिगेशन बंगल्या कडून व शेतकऱ्यांच्या शेतातून येणारे पाणी वाहून जाण्यासाठी ट्रेनेजची व्यवस्था नाही.
पावसाचे पाणी ग्रामस्थांच्या घरांमध्ये घुसणार आहे त्यामुळे ग्रामस्थांचे अतोनात नुकसान व ग्रामस्थांना मोठा त्रास होणार आहे.
हे सर्व टाळण्यासाठी सणसर गावठाण मधील ड्रेनेजचे काम त्वरित करून महापुराच्या पाण्याची अडचण सोडवण्यात यावी.सणसर गावठाण मधील येणारे पावसाच्या पाण्याची ग्रामस्थांना अडचण होणार नाही याची काळजी घेऊन ड्रेनेजचे त्वरित काम करण्यात यावे असे मागणी करण्यात आली आहे.