
प्रतिनिधी-लोकशासन : पुणे ग्रामीण
जंक्शन : इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंगीकृत चालवल्या जाणाऱ्या अत्सित्व लोकसंचलित साधन केंद्रा मध्ये सहयोगीनी पदासाठीची भरती प्रक्रिया पार पडली असून या प्रक्रियेत मोठा सावळा गोंधळ झाला असल्याचे दिसून येत आहे.
इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंगीकृत चालवल्या जाणाऱ्या अत्सित्व लोकसंचलित साधन केंद्रा मधील सहयोगीनी भरती प्रक्रियेची जाहिरात नामांकित दैनिकातून प्रसिद्ध करण्यात आली होती.मात्र हजारो रुपये खर्च करून हि जाहिरात फक्त दाखवण्यासाठीच प्रसिद्ध करण्यात आली होती का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळा अंगीकृत चालवल्या जाणाऱ्या या संस्थे कडून परिक्षा व मुलाखतीचे सर्व नियम धाब्यावर बसवून परिक्षा आणि मुलाखती घेत मनमानी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे.एका परिक्षार्थी ला एक न्याय तर दुसऱ्या परिक्षार्थी ला दुसरा असा दुजाभाव करण्यात आला असून.हि परीक्षा नियोजितरित्या सोयीस्कर करुन निवड करण्यात आल्याचे परिक्षार्थी कडून सांगण्यात येत आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळा अंगीकृत चालवल्या जाणाऱ्या अत्सित्व लोकसंचलित साधन केंद्रा मधील या भरती प्रक्रियेत मोठा सावळा गोंधळ झाला असून या मध्ये आर्थिक देवाणघेवाण झाली आहे का याची चौकशी वरीष्ठ पातळीवरुन करण्यात यावी.या विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या सोबत पत्र व्यवहार करणार असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे इंदापूर तालुका उपाध्यक्ष सुरज पिसे यांनी सांगितले आहे.