
लोकशासन- प्रतिनिधी:संजय शिंदे,ग्रामीण इंदापूर
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे भान ठेवत, मदनवाडी ग्रामपंचायत व तक्रारवाडी यांच्या वतीने एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश केवळ रक्तदानास प्रोत्साहन देण्यापुरता मर्यादित नसून, गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या रक्तसाठ्यात भर घालणे हाच त्यामागचा मुख्य हेतू होता.यावेळी कार्यक्रमाला युवा नेते श्रीराज भरणे, इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक सचिन सपकळ हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.या शिबिरात विविध वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले. यामध्ये प्रामुख्याने १२१ रक्तदात्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदवला.
तसेच सामाजिक भान जपत आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा गौरव करण्यासाठी त्यांना आकर्षक भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. हा उपक्रम रक्तदानासंदर्भातील जनजागृती आणि समाजहितासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन मदनवाडी ग्रामपंचायत चे सरपंच अश्विनी बंडगर यांनी करण्यात आले होते. या प्रसंगी म्हणून मा. जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, भिगवण ग्रामपंचायत सदस्य सचिन बोगावत, सीमाताई काळंगे तक्रारवाडी, युवा नेते अजिंक्य माडगे, चेअरमन विष्णुपंत देवकाते, पुणे जिल्हा सरचिटणीस सतीश शिंगाडे, विद्यमान सदस्य राजेंद्र देवकाते, माजी सरपंच सतीश वाघ, सदस्य तेजस देवकाते, युवा नेते नितीन काळंगे, सुरेश बिबे, सचिन आढाव, अनिल काळंगे आदिजन उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच प्रतिनिधी नानासाहेब बंडगर, समृद्धी क्रीडा प्रतिष्ठान अध्यक्ष कुंडलिक बंडगर, उपसरपंच शहाजी बंडगर, अनिल काळंगे, बंडू बंडगर, धैर्यशील मारकड, निलेश बंडगर राजू कुदळे, गणेश पवार यांनी विशेष प्रयत्न केले.