
लोकशासन- प्रतिनिधी:संजय शिंदे,ग्रामीण इंदापूर
इंदापूर तालुक्यातील शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या संख्या ८३४०० शिधापत्रिकाधारक आहे त्यापैकी ७५ % ई-केवायसी पूर्ण झालेली आहे. राहिलेले २५% अद्यापही पूर्ण झालेली नाही अशी माहिती पुरवठा निरीक्षण अधिकारी सपन गड्डमवार यांनी दिली आहे.तालुक्यात एकूण लाभाध्यर्थ्यांपैकी सुमारे २५% लाभार्थी ई-केवायसी न करताच प्रलंबित स्थितीत आहेत.
यामुळे भविष्यात त्यांना अन्नसुरक्षा योजनांसह इतर शासकीय लाभमिळण्यात अडचणी येऊ शकतात.ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शिधापत्रिकाधारकांनी सपन गड्डमवार यांनी केलेल्या आवाहनानुसार, ज्यांची ई-केवायसी अद्याप झालेली नाही, त्यांनी येत्या दोन दिवसात आपल्या जवळच्या रास्तभाव धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी आपल्या रेशनकार्डची ई. केवायसी दोन प्रकारे करता येते. शासनाच्या अधिकृत पद्वारे व जवळच्या रेशन दुकानामध्ये करता येते. ई. केवायसी करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ आहे. रेशनकार्डवर मिळणारे लाभ सुरू ठेवण्यासाठी ई. केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
यापुढे फक्त पात्र कुटुंबांनाच अनुदानित अन्नधान्य मिळेल. ई. केवायसी न केल्यास लाभार्थ्यांना रेशन मिळू शकणार नाही. रेशनकार्ड निष्क्रिय देखील होऊ शकते. ई केवायसीसाठी लाभार्थ्यांनी आधारकार्ड सादर करणे आवश्यक आहे. आधारकार्ड रेशनकार्डशी लिंक असेल तरच ई केवायसी ऑनलाईन पूर्ण करता येते. रेशन कार्डधारकांनी तातडीने ई केवायसी पूर्ण करणे महत्त्वाचे ठरणार आहे. तालुक्यातील ई. केवायसी पूर्ण केलेल्या राशनकार्ड धारकांनी ३१ जुलै पूर्वी ही ई. केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून, आधार कार्ड आणि अंगठ्याचे सत्यापन यावर आधारित आहे. लाभ गमावू नका केवायसी लवकर करा ! ई-पुरवठा विभागाकडून सातत्याने जनजागृती केली जात असून,लाभाथ्यर्थ्यांनी याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. वेळेवर ई-केवायसी पूर्ण केल्यास अन्नधान्य आणि इतर शासकीय सुविधा सुरळीतपणे मिळणार आहेत. तालुका प्रशासनाचे आवाहन उशीर न करता ई-केवायसी पूर्ण करा आणि आपण लाभा पासून दूर राहू नका. असे आव्हान पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार सपन गड्डमवार यांनी केले.