
लोकशासन– प्रतिनिधी:पुणे
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारणी जाहीर झाली असून या परिषदेच्या कार्याध्यक्षपदी धवलसिंह मोहिते पाटील यांची निवड झाली आहे.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील ३३ जिल्हा संघटनांनी सहभाग घेतला होता.या निवडणूकीत कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी धवलसिंह मोहिते पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती अनंत बदर यांनी काम पाहिले.स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या या परिषदेचे दिर्घकालीन नेतृत्व शरद पवार यांनी केले असून शरद पवारांच्या कार्यकाळात कुस्तीगीर परिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी धवलसिंह मोहिते पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.
कुस्तीला वेळोवेळी चालना देण्याचे व मल्लांना प्रोत्साहन देण्याचे काम धवलसिंह मोहिते पाटील यांच्या कडून वारंवार होत असुन.स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ उपमहाराष्ट्र केसरीला चांदीची गदा व सन्मान करण्यात येतो.धवलसिंह मोहिते पाटील यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातुन त्यांच्या वरती शुभेच्छांचा वर्षाव केला जात असून.त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.