
लोकशासन-प्रतिनिधी : संजय शिंदे (इंदापूर ग्रामीण)
इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथील उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणूकीच्या प्रकियेमध्ये तत्कालीन उपसरपंच करिष्मा सवाणे यांनी राजीनामा दिल्या नंतर मदनवाडी ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदाच्या निवडणूकीच्या प्रक्रियेला सुरवात झाली, नूतन उपसरपंच पदासाठी तेरा सदस्य पैकी उपसरपंच पदासाठी दोन इच्छुक सदस्यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज भरला होता, यामध्ये शहाजी बंडगर आणि सतीश सकुंडे अशी नावे असून यामध्ये शहाजी बंडगर यांनी फॉर्म माघारी घेण्यात आला व सतीश सकुंडे हे बिनविरोध निवड झाली.
यावेळी कार्यकर्त्यांनी विजयाचा पेढा भरवत फाटक्यांची अतिशबाजी करत गुलालाची उधळण करत आनंद उत्सव मोठ्या प्रमात साजरा केला. यावेळी ज्येष्ठ नेते रंगनाथ तात्या देवकाते, सिव्हिल इंजिनियर मारुती (नाना) बंडगर, तुकाराम बंडगर, तेजस देवकते, कुंडलिक बंडगर, मारुती वनवे, गटनेते संपत तात्या बंडगर, दीनानाथ मारणे, कर्मयोगी साखर कारखान्याची संचालक विश्वास देवकाते, अण्णा ढवळे, मारुती बंडगर, ज्ञानदेव बंडगर, शहाजी बंडगर, राजाभाऊ देवकाते, व ग्रामस्थ उपस्थित होते.निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी श्री शेळके भाऊसाहेब व सरपंच अश्विनीताई बंडगर यांनी काम पाहिले.