
लोकशासन-उपसंपादक : शिवाजी पवार
मंत्री हसन मुश्रीफ यांनी जबाबदारी सोडल्या नंतर दत्तात्रय भरणे यांच्या कडे वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी
सध्याच्या देवेंद्र फडणवीस अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या महायुतिच्या सरकारमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव त्यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडल्यामुळे ही जबाबदारी सोलापूरचे पालकमंत्री पद यशस्वीरित्या पार पाडलेले व तत्कालीन राज्यमंत्री क्रीडा युवक कल्याण व अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आली आहे .तसा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या अगोदर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्यामुळे महायुतीच्या सरकारमध्ये त्यांच्यावर वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे इंदापूर तालुका तसेच दत्तात्रय भरणे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांन मध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.