
लोकशासन-प्रतिनिधी : महेश झिटे,श्रीगोंदा ग्रामीण
श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीर गड या ऐतिहासिक गडाचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या पेडगाव येथील ग्रामस्थांना व सर्व शंभूभक्तांना यश येत असून किल्ले धर्मवीरगडाचा राज्य संरक्षित स्मारक होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती सहाय्यक संचालक पुरातत्त्व विभाग नाशिक अमोल गोटे साहेब यांनी दिली आहे, तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ.निलेश खेडकर म्हणाले की तालुक्यातील धर्मवीर गड येथील ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन करण्याचे आमचे अनेक वर्षापासून प्रयत्न चालू होते,किल्ले धर्मवीरगड राज्य संरक्षित स्मारक झाल्यानंतर दुर्ग संवर्धनाच्या दृष्टीने भविष्यात याचा मोठा फायदा होणार आहे.
श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे,भारतीय पुरातत्व विभाग संभाजीनगर येथील श्री. शिवकुमार भगत साहेब, सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग नाशिक येथील श्री. अमोल गोटे साहेब, तहसीलदार वाघमारे मॅडम, उपधीक्षक भूमि अभिलेख श्रीगोंदा जाधव साहेब वरील सर्व शासकीय विभागाच्या सहकार्याने, तसेच ग्रामपंचायत पेडगाव,सर्व शिव शंभू भक्त भारतीय पुरातत्त्व विभाग संभाजीनगर चा एरिया(लक्ष्मीनारायण मंदिर व बालेश्वर मंदिर) वगळून उर्वरित गड राज्य संरक्षित स्मारक होणे कामी, गडाची पुनश्च एकदा रीतसर मोजणी आज करण्यात आली या कामी भूमी अभिलेख श्रीगोंद्याचे पाटील साहेब,डॉ.निलेश खेडकर,संदेश अनभुले, संतोष फराटे, दत्ताजी जगताप, शिवाजी साळुंखे,दादासाहेब जंगले, प्रा.राजेश बाराते, शंकर अप्पा जाधव,भारतीताई इंगवले,विशाल गायकवाड,गडपाल भाऊ घोडके नंदकिशोर क्षीरसागर,मच्छिंद्र पंडित यांनी सहकार्य केले,किल्ले धर्मवीर गडच्या विकासासाठी २०० कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नुकतीच विधानसभा अधिवेशनात आमदार विक्रम पाचपुते यांनी केली आहे.
महायुती सरकार यासाठी लवकरच सकारात्मक पावले उचलणार असल्याने गडाचा सातबारा,टोच नकाशा चतुर् सिमेसह,उपलब्ध करून तो पुढील कार्यवाहीसाठी शासकीय कागदपत्रे सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग नाशिक अमोल गोटे साहेब यांच्याकडे पोहोच करण्यात आली, तसेच यावेळी पर्यटन विभागाचे पवार साहेब यांच्यासोबत देखील गावातील पर्यटन दृष्ट्या सकारात्मक चर्चा करण्यात आली,यामुळे किल्ल्यात व परिसरात असणारे पुरातन अवशेष, छत्रपती संभाजी महाराज स्मारक,मंदिरे,राजदरबार,वेशी,हत्ती मोट, तटबंदी,बुरुंज असे अनेक अवशेष यांचे अचूक मोजमाप व नोंद होणार आहे,दुर्ग संवर्धनाच्या दृष्टीने भविष्यात याचा खुप मोठा फायदा किल्याच्या व गावच्या विकासासाठी होणार आहेअशी माहिती गडदुर्ग संवर्धक डॉ.निलेश खेडकर यांनी दिली, या शिवकार्यामुळे शिवप्रेमी मध्ये आनंदाचे व नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहेत.