नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील एका हाॅटेलात गेलेल्या युवकांना हाॅटेल चालक माझ्या हॉटेलात परत येऊ नको म्हणाला याचा राग आल्याने टोळक्याने हॉटेल मध्ये राडा केला. माझ्या हॉटेलात परत येऊ नको असे हॉटेल चालकाने सांगितल्यावर धारदार शास्त्रे, दांडके घेऊन हाॅटेल चालका व त्यांच्या पित्यास मारहाण करण्यात आली असून या हल्ल्यात पित्यास गंभीर दुखापत झाली आहे.