क्रशर व खाणपट्टाधारकांनी परवानगी घेवूनच उत्खनन करावे पुणे-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Spread the love

लोकशासन : उपसंपादक शिवाजी पवार

पुणे जिल्ह्यातील तात्पुरते व कायमस्वरुपी क्रशर व खाणपट्टाधारकांनी सर्वप्रकारच्या परवानगी घेवूनच उत्खनन करावे, परवानगीकरीता लागणाऱ्या सर्व संबंधित विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेवून परवानगीकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात क्रशर व खाणपट्टाधारकांच्या अडचणी बाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुयोग जगताप, जिल्हा क्रशर खाणपट्टाधारक संघटनेचे अध्यक्ष प्रदिप कंद यांच्यासह जिल्ह्यातील क्रशर खाणपट्टाधारक उपस्थित होते.

क्रशर आणि खाणपट्टाधारकांच्या समस्या जाणून घेवून डुडी म्हणाले क्रशर आणि खाणपट्टा परवानगीकरीता लागणाऱ्या पर्यावरण ना-हरकत प्रमाणापत्राकरीता क्रशर आणि खाणपट्टाधारकांना परवानगी देण्याबाबत पर्यावरण विभागाच्या सचिवांना विनंती करण्यात येईल. क्रशर खाणपट्टाधारकांनी आपल्या वाहनांवर जीपीएस लावून इलेक्ट्रानिक ट्रन्झिंट पासेस (ईटीपी) ठेवावे. आपआपल्या खाणपट्ट्याची भूमी अभिलेख विभागाद्वारे मोजणी करुन घ्यावी. खाणपट्टयात केलेले उत्खनन आणि त्याकरीता भरलेल्या शुल्काचा ताळमेळ संबंधित तहसीलदाराकंडून तपासणी करून घ्यावा हे सर्व क्रश व खाणपट्टा धारकांवर बंधनकारक असेल.

पुणे जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये पारदर्शक पद्धतीने कामकाज करण्यावर प्रशासनाचा भर आहे. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. आपल्या परिसरात बेकायदेशीर कामकाज होत असल्यास प्रशासनास तात्काळ कळवावे, याबाबत तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवून संबंधित क्रेशर वर कारवाई करण्यात येईल,असेही डूडी म्हणाले.

यावेळी बोलताना मापारी म्हणाले कि तात्पुरते खाणपट्टाधारकांनी नियमाप्रमाणे ६ मीटर पेक्षाअधिक खोल खोदकाम करु नये. आवश्यक असलेल्या सर्वप्रकारच्या परवानग्या उपलब्ध करुन देण्याकरीता प्रशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही मापारी म्हणाले.

यावेळी कंद यांनी क्रशर, खाणपट्टाधारकांच्या अडीअडचणींबाबत सूचना केल्या. प्रशासनाच्यावतीने घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करण्यात येईल, असे कंद म्हणाले.

इंदापूर तालुक्यात अनेक खडी क्रशर असुन यापैकी किती खडी क्रशर चे परवाने आहेत.असतील तर त्याचे नुतनीकरण केले आहे.तसेच खाण खोदकाम करताना त्यांची रुंदी खोली याच मोजमाप आहे का ? महसूल व गौण खनिज विभागाच्या ६ मिटर चा नियम खरच पाळला जातोय का आणि पाळला जात नसेल तर तहसीलदार व महसूल आणि गौण खनिज विभाग अशा क्रशर वरती कडक कारवाई करणार का हा देखील प्रश्नच आहे.या खडी क्रशर मुळे पर्यावरणाची तसेच मानवी आरोग्याची हानी तर होत नाही ना अशी इंदापूर तालुक्यातील जनतेत चर्चा आहे.

इंदापूर तालुक्यातील खडी क्रशर चालकांन कडून पर्यावरणाचे नियम धाब्यावर !

इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात खडी क्रशर व्यवसाय सुरू असुन वाळु व रेतीला पर्याय म्हणून सध्या क्रश सॅण्डचा वापर केला जात आहे.त्यामुळे या क्रश सॅण्ड ला सध्या सोन्याचा भाव आला आहे.मात्र खडी क्रशर चालवत असताना पर्यावरण विभागाची परवानगी आवश्यक असते हि परवानगी किती क्रशर चालकांनकडे आहे व असेल तर त्या मधील नियम व अटींची पूर्तता केली जाते का हे देखील पर्यावरण विभागा कडून पाहणे आवश्यक असुन बहुतांश क्रशर वरती पर्यावरण विभागाच्या अटी व नियम फक्त कागदावरच असल्याचे दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button