
लोकशासन-प्रतिनिधी : गणेश गुप्ते , भवानीनगर
भवानीनगर : इंदापूर तालुक्यातील रेशन कार्ड मधील नाव कमी करणे व नावे वाढवण्यासाठी सामान्य नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने ही कामे जलद गतीने कसे होतील याकडे लक्ष देण्याची मागणी इंदापूर तालुक्यातील रेशन कार्डधारकांनी केली आहे. इंदापूर तालुक्यामध्ये लाखो रेशन कार्डधारक असून यामध्ये अनेक कार्ड प्रमुख हे मयत झालेले असून यामध्ये नवीन नावे वाढवण्यासाठी कार्डधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मयत व्यक्तीचे नाव ऑनलाइन कमी न झाल्यास नवीन नावे वाढवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मात्र गेल्या दोन वर्षापासून असे अनेक कार्ड धारक आहेत की त्यांनी इंदापूरच्या पुरवठा शाखेला अर्ज दिलेले आहेत. मात्र आजपर्यंत मयत व्यक्तींचे नावे कमी झालेले नाहीत.तसेच ज्या कार्डधारकांनी ऑनलाइन पद्धतीने नवीन नावे वाढवण्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांचे देखील नावे वाढवण्यासाठी वेळ लागत असल्याने शालेय मुलांना विविध कामकाजासाठी रेशन कार्ड लागते मात्र पुरवठा विभागाने ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्ड वरती गेल्या अनेक वर्षापासून नावे नोंदवलेले आहेत. मात्र ती ऑनलाईन दिसत नाहीत. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील भवानीनगर ते इंदापूर हे अंतर ३५ कि.मी. असून रेशन कार्ड धारक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत असून त्यांना रोज रोजंदारी वरती काम करून आपली उपजीविका करावी लागत असून इंदापूरला तालुक्याच्या ठिकाणी गेल्यास रेशन कार्ड चे कामे होत नसल्याने त्यांचे रोजंदारी ही बुडते आणि तिकडे काम ही होत नाही त्यामुळे इंदापूर तालुक्याच्या रेशन कार्ड धारकां मध्ये संतपाची लाट आहे. तालुक्याच्या ठिकाणी अनेक चकरा माराव्या लागतात. तसेच अनेक महिला रेशन कार्डधारक आणि पुरुष हे अशिक्षित असल्याने त्यांना कोठे जावे हे कळत नाही. तसेच गेल्या अनेक वर्षापासून जे रेशन कार्ड ऑफ लाईन आहेत ते ऑनलाईन कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय? ही प्रक्रिया किचकट असल्याने रेशन कार्ड धारक मेटा कुटीला आलेला. तसेच सकाळी इंदापूरला गेल्यास दिवसभर ताटकळत बसून देखील कामे होत नसल्याने ही कामे लवकरात लवकर कशी होतील याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी इंदापूर तालुक्यातील रेशन कार्ड धारक करीत आहेत.