
लोकशासन- उपसंपादक:गणेश गुप्ते
भवानीनगर : ( दि.२९ ) इंदापूर तालुक्यातील भवानीनगर परिसरातील निंबोडी-भवानीनगर रस्त्याने भरधाव वेगाने येणारे टिप्परवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाग्यनगर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय दुपारगुडे, आबा गुप्ते, बापू बनसोडे, महेश सोनवणे यांनी वालचंद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांना निवेदनाद्वारे केले आहे.
निंबोडी ते भवानीनगर या रस्त्यालगत भाग्यनगर हे गाव असून याच गावामध्ये गोविंदराव पवार विद्यालय आहे.सध्या निंबोडी ते भवानीनगर या रस्त्याचे काम अर्धवट स्वरूपात असून या रस्त्यावरून भरधाव वेगाने टिपर,गाणी लावून, किंवा मोबाईलवर बोलत हे पेपर दामटत असतात अनेक टिपरला नंबर देखील नाहीत यामुळे या परिसरात हायवा हा यमराज ? बनला असुन अनेक विद्यार्थी या शाळेमध्ये शाळेसाठी ये- जा करीत असतात त्यामुळे या ठिकाणी धोका संभवतो आशा टिप्पर चालकांवरती व मालकांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.