युरिया,खतांसोबत इतर उत्पादने सक्तीने विक्री होत असल्यास तक्रार नोंदवण्याचे कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांचे आवाहन

Spread the love

लोकशासन-उपसंपादक:शिवाजी पवार,इंदापूर

खत कंपन्या शेतकऱ्यांना युरिया,खतांसोबत इतर उत्पादने सक्तीने विक्री करत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होते. अशा प्रकारे विभागातील पुणे, सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यातील खत कंपन्या सक्तीने विक्री करत असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

इंदापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी कृषी विक्रेते शेतकऱ्यांना युरिया,खतां सोबतच इतर उत्पादने घेण्यासाठी प्रवृत्त करत असुन इतर उत्पादने न घेतल्यास युरिया खते देण्यासाठी मानाई केली जात असल्याचे शेतकऱ्यांन मधुन सांगितले जात असून यामुळे शेतकऱ्यांना इच्छा नसताना देखील खता सोबत इतर उत्पादनांच्या खर्चाचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे.

अगोदरच शेती व्यवसाय अडचणीत असुन शास्वत उत्पादन तसेच बाजारभाव मिळत नसल्याने अशा प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय कारक परिस्थिती विक्रेत्यां कडून निर्माण केली जात आहे.इंदापूर चे आमदार व कृषीपुत्र असलेल्या दत्तात्रय भरणे यांच्या कडे आता कृषीमंत्री पदाची धुरा आल्याने आता तरी या जुलमी जाचातून शेतकऱ्यांची सुटका होईल अशी भाबडी आशा शेतकरी राजा कडून व्यक्त केली जात आहे.

कृषी सहसंचालकांनी कृषी निवेष्ठांच्या लिंकिंग संबंधी शेतकऱ्यांच्या तक्रारीची सोडवणूक करण्यासाठी विभागातील पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी – ९२२५९५५९५५, अहिल्यानगर ७५८८५५६२७९ व सोलापूर- ७२१९२८६९२८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर तक्रार करावी.शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची गुण नियंत्रण निरीक्षकांमार्फत शहानिशा करून तक्रारीत दोषी आढळून आलेल्या घाऊक किरकोळ विक्रेते यांच्या विरुद्ध खत नियंत्रण आदेश, १९८५ मधील तरतुदीनुसार निलंबन अथवा रद्दची कारवाई करण्यात येईल. तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ चे कलम ३ नुसार पोलीस केस दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल. याची नोंद घेऊन कृषी सेवा केंद्र चालकाने निविष्ठा विक्रीसाठी इतर निविष्ठांची सक्ती (Linking) करु नये, असेही विभागीय कृषी सहसंचालक, पुणे यांनी सूचित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button