
लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण
गेली बारा वर्षापासून श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त. तारादेवी लॉन्स मंगल कार्यालय भिगवण येथे अविरत चालू असलेला वैष्णव मेळावा.राष्ट्रसंत श्रीपाद बाबा यांनी चालू केलेली वैष्णव मेळाव्याची परंपरा आजही भिगवण येथे जशीच्या तशी चालू आहे.सद्गुरु पांडुरंग दादा मडके यांच्या पदस्पर्षाने पावन झालेल्या भिगवण पुण्यनगरीमध्ये गेली बारा वर्षापासून हभप गुरुवर्य सतीश महाराज साळुंके(श्रीगोंदा) यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णव मेळावा संपन्न होत आहे.
महाराजांनी त्यांच्या कडे गुरुपरंपरेने चालत आलेल्या ब्रह्मनामाचा अनुग्रह देऊन भिगवण व परिसरातील कित्येक गावे, भक्तिमय केली आहेत.जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ हरिचे नाम संतांच्या या उक्तीप्रमाणे दुर्मिळ असणाऱ्या ब्रह्मनामाचा अनुग्रह घेऊन परिसरातील कित्येक तरुण मंडळी परमार्थ मार्गामध्ये आली आहेत.संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज यांच्या नामस्मरण, कीर्तन,प्रवचन या मार्गाने परमार्थ (भक्ती) करणारी ही वैष्णव मंडळी.भगवान श्रीकृष्णाच्या जन्माष्टमी निमित्त वैष्णव मेळावा भरवतात.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेले वैष्णव मंडळी तसेच भिगवण व पंचक्रोशीतील भाविक भक्त,परमार्थ प्रेमी मंडळी दीड दिवस किर्तन,प्रवचन, हरिपाठ, श्रीकृष्ण जन्माचे किर्तन, गोपाळ काल्याचे किर्तन… महाप्रसाद…या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटतात.परिसरातील दानशूर मंडळी या वैष्णव मेळाव्यात अन्नदान करतात.कित्येक भाविक भक्त या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात.