
लोकशासन – क्रिडा
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान ठेवलं होतं.या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवशी ६ गडी बाद ३३९ धावा केल्या.पाचव्या दिवशी इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी ३५ धावा करायच्या होत्या.तर भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ४ गडी बाद करायचे होते. सिराजने ५ गडी बाद करून भारतीय संघाला हा सामना ६ धावांनी जिंकून दिला असुन भारताचा या सामन्यात विजय झाला असून पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे.