इंदापूर उपभूमिलेख कार्यालयातील चार अधिकाऱ्यांना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मानित

Spread the love

लोकशासन-प्रतिनिधी: इंदापूर ग्रामीण

इंदापूर : इंदापूर तहसील कार्यालय मध्ये दि.१ ऑगस्ट रोजी महसूल दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात तहसील कार्यालयातील व विविध गावातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा करण्यात आला. त्यामध्ये उपभूमिलेख अधीक्षक सुशीलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर उपभूमिलेख कार्यालयातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चार अधिकारी विश्वनाथ भांडेकर (शिरस्तेदार),अमोल चौधरी (परिरक्षण भूमापक) स्नेहा दिवेकर (न. भू .लिपिक ),हेमंत कदम (भूकरमापक) या कर्मचाऱ्यांना सन २०२४-२०२५ या वर्षा साठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते उत्कृष्ट काम केल्याबद्दल (दि.१) ऑगस्ट २०२५ रोजी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

इंदापूर उपभूमिलेख अधीक्षक सुशीलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव केल्यामुळे इंदापूर उपभूमिलेख कार्यालयाची मान उंचावली आहे. अशा शब्दात उपभूमिलेख अधीक्षक सुशीलकुमार पवार यांनी आपली भावना व्यक्त केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, नुकताच कृषिमंत्री पद मिळालेले दत्तात्रय भरणे यांनी आमच्या कार्यालयातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चार अधिकाऱ्यांचा सन्मान, गौरव केला, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही प्रत्येक येणाऱ्या नागरिकांचा समाधान करण्याचा प्रयत्न करत आहे. मी पदभार स्वीकारल्यापासून नऊ ते दहा महिन्यामध्ये जास्तीत जास्त पेंडिंग किंवा काही दिवसापासून रेंगाळलेली कामे तात्काळ मार्गी लावायचा प्रयत्न केला.अनेक दावे, तक्रारी तात्काळ त्यांचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आमच्या कार्यालयातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानित चारी अधिकाऱ्यांचा आम्हाला कौतुकास्पद आहे. येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्यातील प्रत्येक नागरिकांचा प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. याप्रसंगी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर उपभूमिलेख अधीक्षक सुशीलकुमार यांच्या शिस्तीचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत ,अतिशय किचकट कामात त्यांचा हातखंडा असून ते प्रत्येक नागरिकाचे समाधान करण्याचा प्रयत्न करतात.

इंदापूर उपभूमिलेख कार्यालयास अतिशय चांगला अधिकारी मिळाल्याने त्यांच्या खाली काम करणारे अधिकारी सुद्धा जोमाने काम करतात. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची पाठ थोपटने आमच्यासारख्या कर्तव्य आहे असे ते म्हणाले. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांना चांगलं काम करण्याचं बळ मिळतं, ताकद मिळते.इंदापूर उपभूमिलेख कार्यालयात आनंदाचे वातावरण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button