
लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,ग्रामीण इंदापूर
इंदापूर : वासुंदे,जळगाव,पांढरेवाडी ता.दौंड,इंदापूर,बारामती येथील स्टोन क्रेशर मध्ये पुणे जिल्ह्यातील एका उप प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्याची भागीदारी असल्याची चर्चा बारामती,दौंड तालुक्यात जोरदार चालू आहे.हाच आरटीओ अधिकारी खडी क्रेशर मध्ये बरोबरीत भागीदार असल्याने येथील खडी,क्रश,कच ईत्यादी जड वाहतूक करणाऱ्या हायवा गाड्यांवरती कारवाई करत का नाही.अशी चर्चा दौंड,बारामती तालुक्यात जोरदार रंगू लागली आहे. आणि येथील दौंड तालुक्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्याने येथील स्टोन क्रशर च्या हिश्यातुन आणि जड वाहतूक करणाऱ्या हायवा गाड्या यांच्याकडून प्रती गाडी मासिक तीन हजार रुपये असे मिळून करोडो रुपयांची बेनामी संपत्ती कमावलेली आहे.म्हणून त्यांच्या आणि जवळच्या नातेवाईकांच्या संपत्तीची चौकशी व्हावी अशी मागणी येथील परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे.
या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी केल्यास फार मोठे घबाड सापडण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे. वासुंदे गावात प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन होऊन हजारो हायवा गाड्या (ओव्हरलोड) जड वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरती आरटीओ अधिकारी कारवाई का करत नाहीत हा मात्र मोठा संशोधनाचा विषय बनला आहे.याचाच अर्थ या कारवाईला टाळाटाळ करणारा चाणाक्ष मेंदू याच बेनामी आफाट संपत्ती कमविणाऱ्या अधिकाऱ्याचा आहे अशी देखील चर्चा वासुंदे परीसरात जोरात सुरू आहे.
शासकीय निर्धारित केलेल्या प्रमाणापेक्षा अधीक पटीने जास्त गौणखनिजाची जड वाहतूक होत असुन.गेली कित्येक वर्षे करोडो रुपयांचा शासकीय दंड महसूल स्वरुपात शासनाला याच कामचूकार आरटीओ अधिकाऱ्यामुळे बुडवला जात आहे.या स्थानिक अधिकार्यांच्या आणि स्टोन क्रेशर मालकांच्या संगनमताने करोडो रुपयांची मालमत्ता जमवणाऱ्या या लाचखोर अधिकाऱ्याची आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.
शासकीय पदाचा दुरुपयोग करून गडगंज संपत्ती बेकायदेशीर मार्गाने कमावणाऱ्या लाचखोर,कामचुकार कर्तव्यात कसूर करून कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी आणि या बेकायदेशीर कृत्याला पाठिशी घालणाऱ्या बड्या अधिकार्यांवर देखील कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे. आरटीओंची आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांची चौकशी केल्यास भले मोठे घबाड सापडणार आहे या लाचखोर अधिकाऱ्याने करोडो रुपयांची बेनामी संपत्ती,जमीन,फ्लॅट,सोने नातेवाईकांच्या नावे खरेदी केली असल्याचे एका मासिक कार्ड (३०००/) रुपये जमा कणाऱ्या एका एजंटने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.