
लोकशासन-उपसंपादक:गणेश गुप्ते
भवानीनगर: ( दि.०७ ) इंदापूर तालुक्यातील भवानीनगर-भिगवन हा रस्ता अर्धवट स्वरूपाचा असून हा रस्ता त्वरित करण्यात यावा अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.भवानीनगर येथील छत्रपती कारखान्याची (कॉलनी) ते इंदापूर- बारामती हा रस्ता १ किमी असून या रस्त्याने गेल्या ४०वर्षापासून डांबर कसले असते हेच पाहिले नाही.
निरगुडे, म्हसोबाचीवाडी, लाकडी ,निंबोडी या परिसरातील वाहन चालक पर्यायी मार्ग म्हणून श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा पर्याय म्हणून रस्ता वापरत आहेत मात्र वाहन चालकांचा हक्काचा रस्ता म्हणून भवानीनगर (कॉलनी) ते इंदापूर -बारामती रस्ता करण्यासाठी नेमकं घोड कुठे अडकत आहे ? असा सवाल स्थानिक नागरिक व वाहनचालकांमधून प्रश्न विचारला जात आहे.
अनेक वेळा भवानीनगर (कॉलनी) ते निंबोडी या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले.मात्र भवानीनगर (कॉलनी) ते इंदापूर-बारामती या १ किमी रस्त्याचे काम का होत नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
या रस्त्याबाबत तालुक्याचे आमदार व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व छत्रपती साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक यांनी लक्ष घालून हा रस्ता त्वरित करण्यात यावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांन मधून होत आहे.