डिजिटल पेमेंट करताय सावधान ? हे देखील माहिती असु द्या !

Spread the love

लोकशासन-उपसंपादक: गणेश गुप्ते,इंदापूर

भवानीनगर : दि.(१४) सध्या सर्वच ठिकाणी डिजिटल पेमेंट पाठवले जाते व स्वीकारले जाते मात्र हेच डिजिटल पेमेंट अनेक ग्राहकांची डोकेदुखी बनली आहे यामध्ये ज्येष्ठ नागरिकांपेक्षा तरुण मुलांची फसवणूक जास्त प्रमाणात वाढलेली आहे.

असाच प्रकार सणसर भागातील दोन मित्र होते .
त्यातील एकाने आपल्या मित्राला सांगितले की माझ्या कामाचे पैसे पाच हजार यायचे आहेत ते पैसे तुझ्या खात्यावरती घे आणि मला रोख स्वरूपात काढून दे यानंतर तिसऱ्या व्यक्तीने डिजिटल पेमेंट करून पाच हजार रुपये सोडले व त्यानंतर ते पेमेंट मिळाल्यानंतर त्या दोन्ही मित्रांनी ते पेमेंट काढून त्या मित्राला रोख स्वरूपात देऊन टाकले .

मात्र घडलं वेगळच ज्या व्यक्तीने पैसे पाठवले होते त्याने सायबर फसवणूक झाल्याचे भासवत ज्याला पेमेंट पाठवले होते त्याच्यावरती तक्रार दाखल केली.यानंतर तब्बल एक महिन्यानी खाते बंद पडल्याचे लक्षात आल्यानंतर तो बँकेत गेला त्यानंतर त्याला कळाले की आपल्या वरती सायबर विभागाची तक्रार दाखल आहे.
मात्र ज्याने पैसे पाठवले त्यांनीच ही तक्रार केली आहे.

विशेष म्हणजे ज्याच्या खात्यावर हे पैसे आले त्या व्यक्तीने रोख स्वरूपात पुढील व्यक्तीला देऊनही टाकले.
मात्र ज्याच्या खात्यावर हे पैसे आले तो मात्र अडकला व त्याच्या वरती सायबर क्राईम ही तक्रार पडली?
विशेष करून इंदापूर तालुका हा ग्रामीण मध्ये मोडतो मात्र आजही अनेक ग्राहक फोन पे, गुगल पे, या डिजिटल पेमेंट वरती जास्त भार देतात अशातच आशा फसवणुकीच्या घटना अनेक घडत आहेत.

मात्र अनोळखी व्यक्तीकडून ज्याने पैसे स्वीकारले व काढूनही दिले तो मात्र या जाळ्यात अडकला असुन ”फिर हेरा फेरी”या चित्रपटाप्रमाणे ही घटना घडली.
असून अशा घटना कशा रोखणार हे देखील पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.

याबाबत तक्रारदाराने वालचंद नगर पोलीस ठाण्यामध्ये सायबर विभागाकडे तक्रार देणार असल्याचे सांगितले.
पोलिसांनीही याची वेळीच दखल घेतली असे प्रकार करणार्‍या वरती कडक कारवाई करण्यात यावी असे मागणी तक्रारदाराने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button