
लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,ग्रामीण इंदापूर
वासुंदे : ता.दौंड येथे एकूण १८ खडी क्रेशर चालू असून या ठिकाणी अतिशय अंदा-धुंद कारभार खडी,कच,क्रश,वाहतूकदारांचा चालू आहे.हजारो-लाखो ब्रास खडी,कच,मोठ्या खोल प्रमाणात उत्खनन करून नियमांची पायमल्ली करत वाहतूक करून विक्री केली जात आहे.
परंतू एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या खडी,कच,डस्ट भरून ओहरलोड वाहतूक दिवसा ढवळ्या पाटस-बारामती पालखी महामार्गावरून होत आहे.ही वाहतूक बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती येथील अधिकाऱ्यांना का दिसत नाही ? यांच्यावर ओव्हरलोड ची कारवाई का होत नाही.असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत.
याबाबत उपप्रादेशिक परीवहन अधिकारी बारामती सुरेंद्र निकम यांना संपर्क केला असता,ते म्हणाले की तुमच्या सांगण्यावर आम्ही कारवाई करणार नाही.तुम्हाला आमच्या ऑफिसला लेखी अर्ज करावा लागेल,मगच आम्ही कारवाई करू,असे उर्मट उत्तर त्यांनी दिले,मग हा प्रश्न पडतो की इतर गाड्यांवर कारवाई होते ती अर्ज देऊनच होते का?असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
खणीकर्म शाखा जिल्हाधिकारी पुणे हेसुद्धा वासुंदे येथे काहीच कारवाई करत नसल्यामुळे संबंधित अधिकारी यांना हताशी धरून आर्थिक देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात होत आहे.अशी वासुंदे परीसरात जोरदार चर्चा सुरु आहे.या ठिकाणी ज्यादाची जड वाहतूक करणाऱ्या गाड्यामालकांना मदत करून आरटीओं अधिकारी यांनी लाखो रुपयांची माया कमावली आहे.त्यामुळे संबधित अधिकारी, यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे.अशी मागणी बारामती परिसरातून होऊ लागली आहे.