वर्चस्व वादातून दहशत निर्माण करणाऱ्या राजेंद्र उर्फ राजू भाळे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई – आप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार

Spread the love

लोकशासन-प्रतिनिधी:वालचंदनगर

वालचंदनगर : १७ फेब्रुवारी २०२५ रोजी इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे उत्तम जालिंदर जाधव (वय ३४ रा. खोरोची) याची दगडाने ठेचून व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येत१३ आरोपींचा सहभाग असल्याने निष्पन्न झाले होते. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी मुख्य आरोपी राजेंद्र उर्फ राजू महादेव भाळे (रा. खोरोची), रामदास उर्फ रामा शिवाजी भाळे (रा. खोरोची), शुभम उर्फ दादा बापू आटोळे (रा. शेळगाव), स्वप्नील बबन वाघमोडे (रा. रेडणी), नाना भागवत भाळे (रा. खोरोची), निरंजन लहू पवार (रा. खोरोची), तुकाराम ज्ञानदेव खरात (रा. खोरोची), मयूर उर्फ जिजा मोहन पाटोळे (रा. निमसाखर), अशोक बाळू यादव (रा. शेळगाव) धनाजी गोविंद मसुगडे (रा. कारूंडे ता. माळशिरस जि. सोलापूर), सोमनाथ बबन पवार (रा. कळंब), सनी विलास हरिहर रा. अंथूर्णे), आणि अक्षय भरत शिंगाडे (रा. शेळगाव), यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या विषयी सविस्तर वृत्त असे की पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात दहशत माजवून सातत्याने योजनाबद्ध गुन्हे करणाऱ्या राजेंद्र उर्फ राजू महादेव भाळे यांच्या टोळीतील वरील १३ सदस्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची माहिती बारामती विभागाचे आप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी दिली.

राजेंद्र उर्फ राजू भाळे याच्यावर आत्ता पर्यंत १२ गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील इंदापूर, माळशिरस, नातेपुते या भागामध्ये वर्चस्व वाढवण्यासाठी हा आरोपी नियमबद्ध पद्धतीने गंभीर गुन्हे करत होता. या टोळीच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी वालचंदनगर पोलिसांनी ही मकोका कारवाई केली.

गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी येणाऱ्या काळात जास्तीत जास्त गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे गुन्हेगारांना मदत करणाऱ्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिला.

सदरील कारवाई पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस कर्मचारी महेश बनकर, अभिजीत कळसकर, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, जगदीश चौधरी, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, प्रेमा सोनवणे आणि सचिन खुळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button