
जंक्शन : वालचंदनगर पोलीस ठाणे (ISO मानांकन २०२५) येथे ७९ वा १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहा मध्ये साजरा करण्यात आला. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच “अमली पदार्थ विरोधी सप्ताहाच्या” निमित्ताने लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी जंक्शन-आनंदनगर गावामधून हातामध्ये बॅनर घेऊन प्रभात फेरी काढण्यात आली.यावेळी सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्थेचे शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनी व शिक्षक तसेच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे महिला व पुरुष पोलीस कर्मचारी,अधिकारी यांनी “अमली पदार्थ विरोधी” घोषणा देत जनजागृती केली.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचे सुपुत्र श्रीराज दत्तात्रय भरणे,वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर साहेब,तसेच पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मीठापल्ली साहेब ,गणेश काटकर व सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्थेचे चेअरमन वसंत मोहोळकर, आनंदनगर ग्रामपंचायतचे सरपंच रोहित मोहोळकर ,उपसरपंच सुधाकर कणसे,आनंदघन सोसायटीचे नूतन चेअरमन उदय देशमुख साहेब व्हाईस चेअरमन बाळासाहेब होळ, संतोष कांबळे कोषाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य,दिलीप लोहकरे सामाजिक कार्यकर्ते, आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्खेने उपस्थित होते.