
भवानीनगर : (दि.१७) इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश उत्सव पूर्वतयारी आढाव बैठक घेतली.मागील वर्षी ज्या गणेश मंडळांनी विना डीजे मिरवणूक काढल्या व विविध उपक्रम राबवले अशा मंडळांना सन्मानचिन्ह व प्रशासनपत्र देऊन गौरवण्यात आले.
वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डीजे लावू नये व विविध उपक्रम घेऊन गणेश उत्सव साजरा करण्यात यावा असे आवाहन बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड म्हणाले कायदा आणि सुव्यवस्था कोणी बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल तसेच अनेक गणेश मंडळ हे डिजिटल फ्लेक्स लावत असतात त्यावरती ज्या व्यक्तींच्या वरती गंभीर गुन्हे दाखल आहेत अशांचे फोटो फ्लेक्स वरती लावू नयेत अन्यथा आपल्याला कारवाईला सामोरे जावे लागेल.मात्र हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
विशेष म्हणजे वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६७ गणेश मंडळ येतात वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे बोलताना म्हणाले यामधील अनेक गणेश मंडळे ही रस्त्याच्या कडेला असतात आणि याचमुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होते. त्यामुळे सर्वसामान्यांना ये -जा करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे संबंधित रस्ता जो खात्याच्या अंतर्गत येतो त्या रस्त्याची परवानगी घेणे आवश्यक आहे, महावितरण कडून दहा दिवसांसाठी विज घेण्याबाबत रीतसर पत्र असणे गरजेचे आहे.आपल्या गावांमधील गट -तट आहेत असे निदर्शनास आले आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित अध्यक्ष, उपाध्यक्ष, जबाबदार राहतील व त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे डीजे लावल्यास शासनाच्या नियमाप्रमाणे आवाजाची मर्यादा ओलांडल्यास त्या मंडळावरती कडक कारवाई करण्यात येणार आहे.असे मत प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे व्यक्त केले. यावेळी बेलवाडी, सणसर, भवानीनगर, जाचकवस्ती, निंबोडी, लाकडी, या भागातील गणेश भक्त व गावचे पोलीस पाटील उपस्थित होते यावेळी रतिलाल चौधरी, गणेश काटकर, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मिठ्ठापल्ली, व सर्व बिट अमंलदार उपस्थित होते.