
लोकशासन-प्रतिनिधी:इंदापुर ग्रामीण
अजित पवारांनी “गावकी कडे लक्ष देताय भाऊकी कडे पण लक्ष द्या” या रोहित पवारांच्या वक्तव्यावर बोलताना भाऊकी कडे लक्ष दिले म्हणून तू निवडून आलास अशी प्रतिक्रीया दिली.या वक्तव्या भारतीय जनता पार्टी इंदापुर कडून निषेध व्यक्त करण्यात आला.
कर्जत जामखेड मतदार संघातून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार असलेल्या राम शिंदे यांचा थोड्या मताने पराभव झाला होता.पोस्टल मत मोजणी मध्ये अखेरच्या फेरी मध्ये रोहित पवार साधारण १२०० मतांनी विजयी झाले होते.त्यावेळी देखील अजित पवारांच्या भुमिके बद्दल काही लोकांन कडून शंका उत्पन्न करण्यात आली होती.
दिनांक १६ ऑगष्ट रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना रोहित पवार गावकी कडे लक्ष देताय भाऊकी कडे पण लक्ष द्या असे अजित पवारांना उद्देशून बोलले असताना भाऊकी कडे लक्ष दिले म्हणून तू निवडून आलास असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.त्यामुळे अजित पवारांच्या या वक्तव्या भारतीय जनता पार्टी इंदापुर कडून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी राज्य परिषदेचे सदस्य माऊली चवरे , पंचायत राज संयोजक माऊली वाघमोडे, इंदापुर शहर मंडल अध्यक्ष किरण गाणबोटे,सचिन आरडे प्रदेश सरचिटणीस अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र आदी उपस्थित होते.