
लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,ग्रामीण इंदापूर
इंदापूर : स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था मदनवाडी यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले या संस्थेच्या वतीने ६ शाळांना शाळेची बॅग ,वही,पेन ,कंपास व इतर साहित्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये जि प प्राथमीक शाळा माळीवस्ती ( देवकाते वस्ती), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंडगरवस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विरवाडी नं.१ , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मदनवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सकुंडे वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विरवाडी नंबर 2 या शाळेतील सुमारे 150 मुलांना शाळेचे दप्तर व शालेय वस्तू देण्यात आल्या.
संस्थेचे अध्यक्ष सुरज सोट पाटील व सचिव धीरज सोट पाटील यांनी सांगितले की पुढील कार्यक्रमास काही मदत लागल्यास मी नक्की देण्याचा प्रयत्न करीन. संस्थेच्या वतीने असे अनेक उपक्रम वारंवार राबविले जातात.असे संस्थेच्या अध्यक्ष व सचिव यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.यावेळी भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा अनुष्काताई भरणे,सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदजी महांगडे साहेब, कर्मयोगीचे माजी संचालक रंगनाथ तात्या देवकाते,श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष सतीश शिंगाडे संस्थेचे मार्गदर्शक दिलीप आण्णा सोट पाटील कर्मयोगी कारखान्याचे संचालक विश्वास देवकाते सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बापू नरूटे, माजी उपसरपंच सतीश सकुंडे, माजी उपसरपंच राजाभाऊ देवकाते, नवनाथ नरुटे, जाफर मुलाणी, सागर सोट पाटील, संदीप डोंबाळे ,सागर सुतार, सौरभ सोट पाटील, पत्रकार संजय शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक वाघ सर सहशिक्षक प्रमोद कुमार कुदळे सर संस्थेचे अध्यक्ष सुरज सोट पाटील सचिव धिरज सोट पाटील व या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते