
लोकशासन-प्रतिनिधी:इंदापुर ग्रामीण
इंदापुर तालुक्यातील प्रती शिखर शिंगणापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदकिशोराचे भाजप चे नेते प्रवीण माने यांनी दर्शन घेत तालुक्याच्या विकासासाठी नंदकिशोरा चरणी साखडे घातले.
इंदापुर तालुक्यातील दगडवाडी येथील नंदकिशोर देवस्थान हे प्रती शिंगणापूर म्हणून प्रसिद्ध असून श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी या मंदिरा मध्ये मोठी यात्रा भरते या या यात्रेसाठी इंदापुर सह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस आदी भागातील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात.
इंदापुर तालुक्याचे श्रध्दास्थान असलेल्या नंदकिशोरा चरणी प्रविण माने व भाजप पदाधिकारी यांनी इंदापुर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.या वेळी बोलताना भाजप नेते प्रविण माने दगडवाडी येथील नंदकिशोर देवस्थान हे क दर्जाचे देवस्थान असून या देवस्थानच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निधीसाठी प्रयत्नशील राहणार असून भविष्यात या देवस्थानचा काया पालट करणार असल्याचे सांगितले.
या वेळी कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती मयूर पाटील, पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे,ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा अध्यक्ष गजानन वाकसे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब शेंडे,इंदापुर तालुकाध्यक्ष राजकुमार जठार,ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा सरचिटणीस आबासाहेब थोरात, इंदापुर तालुका उपाध्यक्ष सत्यजीत रणवरे,महामंत्री सुरज पिसे,महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष सुजाता कुलकर्णी,उपाध्यक्ष कुलदीप पोळ,प्रवीण शहा,चिन्मय कुलकर्णी,निलेश माने आदी मान्यवर उपस्थित होते.