
लोकशासन-उपसंपादक: गणेश गुप्ते
चाकण : (दि.१९) रोहकल (ता.खेड) चाकण शहरालगत असणारी पोदार इंटरनॅशनल स्कुल ही प्रशाला विध्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच कला क्रीडा, साहित्य यांचे ही ज्ञान देणारी प्रशाला आहे.प्रशालेतील विध्यार्थ्यांना आपल्या रूढी ,परंपरा व संस्कृतीची ओळख व्हावी व त्यांनी त्या परंपरा जोपसाव्यात हा मानस समोर ठेवून प्रशालेत निरनिराळ्या उत्सवांचे आयोजन हे वेळोवेळी केले जाते.त्या अनुषंगानेच संपूर्ण जगताला शांतेचा संदेश देणाऱ्या प्रभू श्री कृष्ण यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा व गोपाळकाला पोदार इंटरनॅशनल स्कुल रोहकलं चाकण प्रशालेत उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथम कार्यक्रमास लाभलेले प्रमुख अतिथी वाकी बु || ता.खेड चे सरपंच श्री. रमेश टोपे प्रशालेचे प्राचार्य श्री.विशाल जाधव या मान्यवरांच्या शुभहस्ते, दीपप्रज्वलन ,श्री कृष्ण मूर्तीपूजन व हंडीचे पूजन करण्यात आले.तसेच इयत्ता सहावी ते नववीच्या विध्यार्थ्यांनी प्रभू श्री कृष्ण यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी मनोगते सादर केली व दुर्वा बिबवे व सर्वज्ञा लोखंडे या विध्यार्थिनींनी सुमधुर कृष्ण गिते व भजन यांचे गायन केले.तसेच प्रशालेतील इयत्ता पहिली ते चौथी च्या तब्बल पाचशे विध्यार्थ्यांनी प्रभू श्री कृष्ण व राधा यांची वेशभूषा साकारून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

सदर कृष्ण जन्माष्टमी मध्ये बाळ गोपाळासाठी दहीहंडी चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक वर्गातील एका संघाने , दही हंडीस उंच मनोरे करून मानवंदना दिली व इयत्ता नववीच्या संघाने सदर दहीहंडी फोडण्याचा बहुमान मिळवला. यावेळी विध्यार्थ्यांनी सकारलेल्या वेशभूषा हा कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरल्या.
या कार्यक्रमा मध्ये प्रशालेतील तब्बल आकराशे विध्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला . यावेळी प्रशालेचा संपूर्ण परिसर हा कृष्ण भक्तीने न्हावुन गेला व संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झाल्याचे पाहावयास मिळाले.
यावेळी प्रमुख अतिथी यांनी, उपस्थित सर्वांना कृष्ण जन्माष्टमी च्या शुभेच्छा दिल्या व प्रशाला विध्यार्थ्यानासाठी घेत असलेल्या परिश्रमाचे कौतुक केले.
यावेळी बोलताना,प्रशाळेचे प्राचार्य विशाल जाधव यांनी, आपण प्रत्येकाने, प्रभू श्री कृष्ण यांनीं दिलेलि शिकवण तसेच शांततेच्या मार्गाचा अवलंब हा आपल्या जीवनात करावा तसेच. जीवनात यशप्राप्तीसाठी मेहनत, विश्वास, कार्यमग्नता आणी भक्ती व संयम या मूल्यांची खूप आवश्यकता आहे ही बाब प्रत्येकाने आत्मसात करावी असे प्रतिपादन केले व उपस्थित सर्वांना कृष्ण जन्माष्टमी च्या शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे आयोजन शालेय सांस्कृतिक विभागाने केले.सूत्रसंचालन, शिक्षिका नेहा शर्मा यांनी केले तर आभार प्रणोती खंडाळकर यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी विध्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.