
प्रतिनिधी-लोकशासन:इंदापुर ग्रामीण
इंदापुर ग्रामीण : इंदापुर तालुक्यातील जंक्शन येथे शनिवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक रोहित मोहोळकर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळयासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे असणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते प्रविण माने,माजी आमदार यशवंत माने,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूर पाटील,छत्रपती साखर कारखान्याचे चेअरमन पृथवीराज जाचक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जंक्शन येथील बँक ऑफ बडोदा येथील मैदानावर हा सोहळा रंगणार असून कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण गौतमी पाटील असणार आहे.